Dhurandhar 2 : 10 दिवसात रणवीर सिंह याच्या धुरंधर-2 ने केले 10 विक्रम, तिकीटबारीवर अक्षरश: पैशांचा पाऊस
admin March 29, 2026 07:27 PM
[ad_1]
Dhurandhar 2 : 10 दिवसात रणवीर सिंह याच्या धुरंधर-2 ने केले 10 विक्रम, तिकीटबारीवर अक्षरश: पैशांचा पाऊस

Ranveer Singh Dhurandhar 2 Big Records: साल २०२५ मध्ये धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान आणले होते. या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले होते. सर्वत्र धुरंधर चित्रपटातील अभिनयाची चर्चा होती. रणवीर सिंह प्रमुख अभिनेता असूनही अक्षय खन्नाचा रहमान डकैत भाव खाऊन गेला होता. मात्र, धुरंधर- २ मध्ये रणवीर सिंह याने ही कसर भरुन काढली आहे. या चित्रपटाने आता १३०० कोटीहून जास्त कमाई करत देशाच्या टॉप-५ चित्रपटात एण्ट्री मारली आहे.

धुरंधर- २ आता सिनेमागृहात कमाल करत आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन केवळ १० दिवस झाले आहे. या दहा दिवसात कलेक्शन १२०० कोटीपर्यंत झाले आहे. यामुळे दरदिवशी सरासरी १०० कोटींची कमाई होत आहे. चला तर पाहूयात १० दिवसात ‘धुरंधर-२’ ने कोण-कोणते विक्रम केले आहेत.

1 ) एडव्हान्स बुकींगमध्ये सर्वाधिक तिकीट्स

धुरंधर- २ चित्रपटाने बुक माय शो एपमधून विक्रीच्या बाबती ९ दिवसात तिसरे स्थान मिळवले आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या जवानला मागे टाकले आहे.
बुक माय शोमध्ये या चित्रपटाची १२.४ दशलक्ष तिकीटे विकली आहेत, याहून जास्त आता केवळ विकी कौशल ( १२.५९ दशलक्ष ) याचा छावा चित्रपट आहे. तर १३ दशलक्ष तिकीटांच्या विक्रीसह धुरंधर पार्ट – 1 पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

2 ) पेड प्रिव्यूमधून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

धुरंधर – २ या चित्रपटाने रिलीजच्या आधीच कमाल केली होती. या चित्रपटाने पेड प्रिव्यूजच्या बाबतीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. पेड प्रिव्यूने या चित्रपटाने ४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. आता पर्यंत कोणत्याही चित्रपटाने ही कमाई केलेली नाही.

3 ) सर्वात मोठा बॉलीवूड ओपनिंग चित्रपट

धुरंधर – २ चित्रपटाने बॉलीवूडची सर्वात मोठी ओपनिंग फिल्म बनण्याचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. या चित्रपटाने २०० कोटीहून जास्त कलेक्शन केले आहे.पहिल्याच दिवशी धुरंधर – २ ने २४० कोटीच्या आसपास कमाई केली होती. असा विक्रम करणारा हा बॉलीवूडचा एकमेव चित्रपट आहे.

4) दुसरा सर्वात वेगवान १००० कोटी कलेक्शन करणार चित्रपट

धुरंधर-२ ने सात दिवसातच १००० कोटी रुपयांहून जास्त कमाई केली आहे. बॉलीवूडच्या इतिहासात असा विक्रम करणारा हा पहिला चित्रपट आहे. चार दिवसात १००० कोटीचे कलेक्शन करणारा पहिला चित्रपट पुष्पा-२ आहे.

5) हिंदीत सर्वात वेगवान ५०० कोटीची कमाई

कोणत्याही चित्रपटाने आतापर्यंत इतके शानदार ओपनिंग केलेले नाही. धुरंधर-२ ने सर्वात वेगवान ५०० कोटीचे कलेक्शन केले. असा करणारा हा पहिला चित्रपट आहे.या चित्रपटाने ३ दिवसातच ५०० कोटी कमावले.

6) साल २०२६ सर्वात मोठी ओपनिंग –

साल २०२५ मध्ये हा चित्रपट सर्वात जास्त ओपनिंग करण्यात मागे होता. परंतू दुसऱ्या पार्टने ही कमतरता पूर्ण केली आहे.साल २०२६ चे आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग २४० कोटी कमाई करणारी फिल्म ठरली आहे.

7) ६ दिवसापर्यंत ५० कोटीहून जास्त नेट कलेक्शन –

नेट कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट भारी आहे. सहा दिवसापर्यंत सतत या चित्रपटाचे कलेक्शन ५० कोटीहून जास्त होते. तर पहिल्या विकेंडला हीचा वर्ल्ड वाईड कलेक्शन १०० कोटी रुपयांहून जास्त होते.

8) ओव्हरसीज कलेक्शनमध्येही पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कलेक्शन

ओव्हरसीज कलेक्शन एखादा चित्रपट २०० कोटी रुपयांचे कलेक्शन पार करतो असे खूप कमी वेळा झाले आहे. काही मोजक्या चित्रपटाने ही कमाल केली आहे. धुरंधर-२ ने ओव्हरसीज कलेक्शनमध्येही धडका लावला आहे. या चित्रपटाचे एकाच आठवड्यात ओव्हरसिज कलेक्शन २५० कोटीवर पोहचले होते.

9) केरळात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट –

साऊथमध्ये केरळात या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटाचा विक्रम केला आहे. केरळात या चित्रपटाने १४ कोटींची कमाई केली आहे.याआधी शाहरुखच्या जवानने हा रेकॉर्ड केला होता. केरळात जवानने १३ कोटी कमावले होते.

10) १००० कोटी करणाऱ्या टॉप-१० मध्ये समाविष्ट –

धुरंधर-२ हा बॉक्स ऑफीसच्या इलीट लिस्टमध्ये समाविष्ठ झाली आहे. १००० कोटी कलेक्शन करणारा हा १० वा चित्रपट ठरला आहे. कलेक्शनच्या बाबती कल्की, पठाण, जवान आणि केजीएफ चॅप्टर -२ ला मागे टाकले आहे. आणि धुरंधर-२ हा टॉप-५ मध्ये एंट्री मारण्याच्या बेतात आहे.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.