ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2026 | रविवार
एबीपी माझा ब्युरो March 29, 2026 09:13 PM

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2026 | रविवार*

*1*. भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ, तपास पूर्ण न झाल्याचा यंत्रणांचा युक्तिवाद https://tinyurl.com/3ws2jb3s  जामीन मिळवण्यासाठी अशोक खरातच्या वकिलांचा आटापिटा, जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने भोंदूला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली https://tinyurl.com/3jdufnw9 

*2*. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात गौप्यस्फोट https://tinyurl.com/mr2mn2j5  अशोक खरात पोलिसांना धड उत्तरं देईना, महिलांचा उल्लेख करताच उडवाउडवीची उत्तरं, सरकारी वकिलांनी कोर्टात काय-काय सांगितलं? https://tinyurl.com/4ajs292u 

*3*. अशोक खरातशी संबंधित शिवनिका संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर, रुपाली चाकणकरांना समन्स, संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/ucmh75z6  तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही, माईंड रिडिंगमध्ये तरबेज असणारा अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा? चौकशीत धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/ynvem8t8 

*4*. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ अजून निघून गेलेली नाही, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात विलिनीकरण झालं तर अभिमानाची बाब, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य https://tinyurl.com/2mv582kd  विलिनीकरणावर सुनील शेळकेंची भूमिका व्यक्तिगत की पक्षाची माहीत नाही, पण निर्णय सुनेत्रा पवारच घेतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया, विलिनीकरणामध्ये भाजपकडून दबाव नसल्याचंही तटकरेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4j9bsnjz 

*5*. मुंबईतील मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांसाठी प्रत्येकी पाच सिलेंडर द्या, मंत्री मंगल प्रभात लोढांची मंत्री छगन भुजबळांकडे मागणी, 'आम्ही गिरगावकर' संघटनेसह विरोधकांची लोढांवर टीका  https://tinyurl.com/mvkzhtfa  आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, शेती क्षेत्रावर मोठा परिणाम; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता https://tinyurl.com/zb63jzw9 

*6*. राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा अंदाज https://tinyurl.com/msta4u2v 

*7*. पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा, दोन चिमुकली मुलं पोरकी; जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना https://tinyurl.com/mpst8ffz  प्रियकराला शेवटचा व्हिडीओ कॉल, घरात कुणी नसतांना टोकाचं पाऊल, नागपुरात शिक्षण घेत असलेल्या वाशिमच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या https://tinyurl.com/mu76z78u 

*8*. पुण्यात दोन परदेशी मुलींचा डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yrcyyrwv  दुचाकीवरून जाताना पाच युवकांनी अडविले, नंतर 18 वर्षीय तरुणीसोबत नको ते कृत्य केलं, मित्रालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण, अमरावतीतील संतापजनक घटना https://tinyurl.com/wnb9kza2 

*9*. इराणची राजवट उलथवून टाकण्यास निघालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर, हुकूमशाही खपवून घेणार नाही असं सांगत 'नो किंग्ज रॅली'च्या माध्यमातून आंदोलन https://tinyurl.com/d8jbxj2t 

*10*. वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये आज हाय-व्होल्टेज थरार रंगणार, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिला सामना जिंकून 13 वर्षांचा कलंक पुसण्यासाठी मुंबई सज्ज, रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष https://tinyurl.com/3shvejcf  गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ, पहिल्याच सामन्यात हैदराबादचा 8 विकेट्सनी पराभव https://tinyurl.com/355jff55 

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658* 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.