नुकतीच सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी समोर आलीये. लोकप्रिय बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं आकस्मिक निधन झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. अभिनेता शूटिंग संपल्यावर समुद्रात गेला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अशा मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी प्रियांका सरकार हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा काळ कुटुंबासाठी कठीण असल्याने त्यांना प्रायव्हसी देण्याचीही मागणी केलीये.
राहुल आणि प्रियंकाने २०१० मध्ये लग्न केलेलं, मात्र २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. तरीही, २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही मिळून आपल्या मुलाचा सांभाळ मिळून करत होते. आता पतीच्या मृत्यूनंतर प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केलीये. तिने लिहिलं, 'हा काळ आमच्यासाठी अत्यंत दु:खद आणि निराशेचा आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वांना विनंती करतो की, आम्हाला आमचा खासगी वेळ द्यावा. एका मुलाचे वडील, एका आईचा मुलगा आणि एका कुटुंबाचा आधार आम्ही गमावला आहे. आम्ही सर्वजण या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत.'
View this post on InstagramA post shared by Priyanka Sarkar (@priyankasarkarz)
तिने पुढे विनंती करत लिहिलं, 'मी आमचे मित्र आणि माध्यमातील सहकाऱ्यांना विनंती करते की, आमच्या कुटुंबातील वैयक्तिक वेळेचा आदर करावा. आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करू नका. हे दुःख शांततेत व्यक्त करण्याची आम्हाला थोडी मोकळीक द्या. या कठीण काळात तुम्ही आम्हाला ज्या प्रकारे समजून घ्याल आणि पाठिंबा द्याल, तो आमच्यासाठी मोलाचा आहे.' राहुल ओडिसामधल्या दिघाजवळ 'भोलेबाबा पार करेगा' या मालिकेच्या शूटिंगसाठी गेले होते. मात्र रविवारी दुपारी चित्रीकरण संपल्यानंतर राहुल एकटाच समुद्रकिनारी गेला होता, तिथे पाण्यात उतरल्यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने आता घरच्यांसोबतच प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसलाय.
नव्या मालिकांसाठी जुन्या मालिकांचा फुटबॉल; स्टार प्रवाहाच्या दोन मालिकांची वेळ बदलली; प्रेक्षक म्हणतात- त्यांना