RR vs CSK : सीएसकेला झटपट 6 झटके, जडेजाकडून 1 ओव्हरमध्ये दोघांचा गेम, यलो आर्मीची टॉप-मिडल ऑर्डर ढेर
GH News March 31, 2026 12:11 AM

सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्सचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज आयपीएल 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरले आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये लोकल बॉय आणि कॅप्टन रियान पराग याने टॉस जिंकून सीएसकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवत एक एक करुन सीएसकेच्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर सीएसकेचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील युवा आणि अनुभवी फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे सीएसके अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सीएसकेच्या लोअर ऑर्डरमधील फलंदाजांवर सर्व मदार असणार आहे.

टॉप-मिडल ऑर्डर ढेर

संजू सॅमसन, कॅप्टन ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट आणि शिवम दुबे हे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. सर्फराज खान याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र सर्फराज त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला.

संजू सॅमसन पदार्पणात अपयशी

संजू सॅमसन याने राजस्थान विरुद्ध सीएसकेसाठी पदार्पण केलं. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरलेल्या या फलंदाजाकडून यलो आर्मीला मोठ्या खेळीची आशा होती. मात्र संजूला टीम ड्रीम सुरुवात करता आली नाही. संजूने 6 धावा केल्या. संजूनंतर कॅप्टन ऋतुराज यानेही 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. स्टार फलंदाज आयुष म्हात्रे याला भोपळाही फोडता आला नाही. आयुष म्हात्रे गोल्डन डक ठरला. मॅथ्यू शॉर्ट याने 2 धावांचं योगदान दिलं.

संजूप्रमाणे सर्फराज खान यानेही सीएसकेसाठी पदार्पण केलं. सर्फराजने आश्वासक सुरुवात केली. सर्फराज यलो आर्मीसाठी संकटमोचक ठरेल, असं वाटत असताना रवींद्र जडेजा याने सर्फराजच्या खेळीचा शेवट केला. जडेजाने सर्फराजला एलबीडब्लयू केलं. सर्फराजने 12 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 17 रन्स केल्या.

ऑलराउंडर शिवम दुबेकडून निराशा

सर्फराज खान आऊट झाल्याने सीएसकेची 7.2 ओव्हरमध्ये 5 आऊट 51 अशी स्थिती झाली. त्यामुळे ऑलराउंडर शिवम दुबेकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र शिवमनेही सीएसकेच्या आशेवर पाणी फेरलं. रवींद्र जडेजा याने सर्फराज आणि त्यानंतर शिवमला एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं. संजू आणि ऋतुराज प्रमाणे शिवमही 8 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे सीएसकेची 8 ओव्हरनंतर 6 आऊट 57 अशी स्थिती झाली. त्यामुळे आता सीएसकेचे 4 फलंदाज उर्वरित 12 षटकांत किती धावा जोडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.