Vastu Shastra : घरात या पाच वस्तू कधीच नसाव्यात, अन्यथा घर बरबाद झालचं म्हणून समजा
Tv9 Marathi March 31, 2026 01:45 AM

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंचा तुमच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. तुमच्या घरात असलेल्या वस्तू, ऑफिसमध्ये असलेल्या वस्तू सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तयार करतात, त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू आणताना काळजी घ्यावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच काही वस्तू या अत्यंत शुभ असतात, अशा वस्तू घरात ठेवल्यास आपली भरभराट होते, मात्र जर अशा वस्तू ठेवण्याची दिशा चुकली तर त्याचा उलटा परिणाम देखील आपल्यावर होऊ शकतो. वास्तुशास्त्रात दिशांना देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे योग्य वस्तू या योग्य ठिकाणीच ठेवल्या पाहिजेत, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात ज्या घरात ठेवणं अशुभ माण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या वस्तू घरात ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

फुटलेला आरसा – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही फुटलेला आरसा ठेवू नये. कारण अशा आरशामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडतो. जर घरात फुटलेला आरसा असेल तर अचानक आर्थिक अडचणी येतात. जे काम होणार असतील ती कामं रखडली जातात, ज्यामुळे आपल्याला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे घरात कधीही फुटलेला आरसा नसावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

खंडीत झालेल्या मूर्ती – ज्या मूर्ती खंडीत झाल्या आहेत, ज्यांना तडा गेला आहे, अशा मूर्ती कधीही देवघरात असू नये, अशा मूर्ती देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा मूर्तींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कामात अडथळे येतात, त्यामुळे अशा मूर्ती विधिपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

खराब झालेलं फर्निचर – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही खराब फर्निचर नसावं, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात. त्यामुळे जर तुमच्याकडे जर खराब झालेलं फर्निचर असेल तर त्याला घराच्याबाहेर काढावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बंद पडलेलं घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ असू नये, कारण घड्याळ हे गतीचं प्रतिक मानंलं जातं. त्यामुळे घरात बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

खराब इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात अशा वस्तू असतील तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घर अशांत होतं, त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नयेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.