Vastu Shastra : व्यवसाय, नोकरीमध्ये अडथळे येतायेत? मग शनिवारी करा हा सोपा उपाय
Tv9 Marathi March 31, 2026 01:45 AM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यात जर काही समस्या येत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्याला अनेकदा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये काही अडथळे निर्माण होतात. जसं की व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटते आपल्याला व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळत नाही, इतरही काही अडचणी येतात, तसंच नोकरीमध्ये देखील काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तरी देखील तुम्हाला या उपायामुळे फायदा होऊ शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या उपायाबद्दल.

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्यानं कोणत्या देवाला समर्पित असतो. जसं की सोमवार हा भगवान महादेव यांना समर्पित असतो. मगंळवार देवीला समर्पित असतो. गुरुवार हा भगवान दत्त आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो. शुक्रवार हा वार देवींना समर्पित असतो. तसाच शनिवार हा दिवस शनी देव आणि हनुमान यांना समर्पित असतो. जर तुम्हाला नोकरीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्हाला शनिवारी एक सोपा उपाय करायचा आहे. शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर एका लाल कापडामध्ये थोडीशी साखर घ्या आणि त्यात तुळशीचे दोन ते तीन पानं ठेवा. या कापडाची गाठ मारा आणि त्यानंतर ते हनुमानांना अर्पण करा. हा उपाय काही शनिवार केल्यास तुमच्या भाग्यातील सर्व अडथळे दूर होतात, आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे.

या उपायामुळे जर तुम्हाला नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर ते दूर होतील, एवढंच नाही तर तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमची ती देखील इच्छा पूर्ण होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या शिवाय तुम्ही शनीदोष दूर करण्यासाठी इतरही काही उपाय करू शकता.जसं की दर शनिवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरा शेजारी जे शनी मंदिर आहे, तिथे जाऊन शनी देवांचं दर्शन घ्या, शनी मंत्राचा जाप करा. शनी महाराजांना काळे तीळ आणि तेल अर्पण करा. यामुळे तुमच्या पाठीमागची साडेसाती दूर होऊन, सदैव तुमच्यावर शनी महाराजांची कृपा राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.