खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात सुमारे तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.
तसेच, १ एप्रिलपासून टोल नाक्यावर रोखीचे व्यवहार बंद होणार आहेत, अशी माहिती पुणे- सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिली.
खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात गतवर्षीपेक्षा सुमारे तीन टक्के वाढ केली आहे. स्थानिक नागरिकांनी गैर व्यावसायिक वाहनांसाठी सवलतीच्या दरातील मासिक पास घ्यावा. तसेच, टोलनाक्यावर १ एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.
- अमित भाटीया, पुणे- सातारा टोल रोड व्यवस्थापक