आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 एप्रिल 2026
esakal April 01, 2026 10:45 AM

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.३० सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सायंकाळी ६.१६ चंद्रास्त पहाटे ६.२१, हनुमान जन्मोत्सव उपवास, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ७.०७, भारतीय सौर चैत्र ११ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००४ - पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करण्याची संस्मरणीय कामगिरी भारतीय संघाने केली.

  • २०१४ - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेत बदल करून जन्मठेप करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.