LSG vs DC : ऋषभ पंत-संजीव गोयनका यांच्यात वाजलं का? पहिल्याच मॅचमधील पराभवानंतर LSG च्या कॅम्पमध्ये मोठ्या घडामोडी VIDEO
Tv9 Marathi April 02, 2026 01:45 PM

लखनऊ सुपर जायंट्ससाठी इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या सीजनची सुरुवात निराशाजनक झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने लखनऊच्या टीमला 6 विकेटने हरवलं. लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकट स्टेडियममध्ये ही मॅच झाली. या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 142 धावांचं टार्गेट दिलं होतं. टी20 क्रिकेटमधील हे खूप कमी टार्गेट आहे. दिल्ली कॅपिटल्स टीमची सुरुवात खूप खराब झाली. त्यांनी अवघ्या 26 रन्समध्ये 4 विकेट गमावले होते. सामना एकतर्फी होईल असं वाटत होतं. पण समीर रिजवी आणि ट्रिस्टन स्टब्सने कमाल केली. दोघांनी आधी दिल्लीचा डाव संभाळला. मग लखनऊच्या गोलंदाजांवर पलटवार करताना 119 धावांची मॅचविनिंग पार्टनरशिप केली.

इम्पॅक्ट सब म्हणून आलेल्या समीर रिजवीने 47 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स 32 चेंडूत नाबाद 39 धावांची महत्वाची इनिंग खेळला. दिल्लीनेया दोघांच्या फलंदाजीच्या बळावर 17.1 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. मॅच संपल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स टीमचे मालक संजीव गोयनका, कॅप्टन ऋषभ पंत आणि कोच जस्टिन लँगर मैदानावर गंभीर चर्चा करताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत गोयनका दोघांना काहीतरी सांगताना दिसले. ऋषभ पंत आपली बाजू सांगत होता. ही चर्चा पाहिल्यानंतर फॅन्सनी वेगवेगळे अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे. ही रणनिती संदर्भात चर्चा सुरु होती की नाराजी. याचा अंदाज लावण कठिण आहे.

Sanjiv Goenka belting LSG captain Rishabh Pant after today’s loss. pic.twitter.com/DnElMSWWZp

— JJ (@IdliHaterr)

Sanjiv Goenka had a chat with Rishabh Pant and the support staff after their loss to the Delhi Capitals. 👀 pic.twitter.com/AUEW3qrNLd

— Gurmeet (@CricGurmeet)

Here we go, Desperate Sanjiv Goenka along with his son and wife with LSG team management and Captain Rishabh Pant.

I repeat, he is desperate to win an IPL Championship!! pic.twitter.com/15GhtYrQSE

— कट्टर KKR समर्थक 🦁🇮🇳 ™ (@KKRWeRule)

तेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं

गोलंदाजीत लखनऊ सुपर जायंट्सने चांगली सुरुवात केली. लखनऊ सुपर जायंट्ससाठी डेब्यू करताना मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर मोहसिन खान आणि प्रिन्स यादव यांनी आणखी विकेट काढून दिल्लीच्या टीमला बॅकफूटवर ढकललं. पण त्यानंतर लखनऊच्या गोलंदाजांना सामन्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही. तेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.