Gold Price Today in India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जनतेला संबोधित केल्यावर जगभरात त्याचे पडसाद उमटत असून जागतिक बाजारातही त्याचे परिणाम दिसून आले. एकीकडे कच्च्या तेलाचे भाव वाढून 105 डॉलरच्या वर पोहोचले आहेत, पण जनसामान्यांचं लक्ष लागलेल्या सोनं-चांदीच्या दराचं काय ? ट्रम्प यांच्या भाषणानंतर MCXवर सोन्यात मोठी घसरण दिसून आली. गुरुवारी सकाळी सोन्याचे दर तब्बल 2279 रुपयांनी घसरून 1 लाख 51 हजार 429 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर पोहोचले आहेत. मात्र असं असलं तरी किरकोळ बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,960 वर पोहोचला आहे, तर 22 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,40,210 रुपये इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्यासाठी आजा 1, 14, 720 रुपये प्रति 10 ग्रॅमसाछी मोजावे लागणार आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत दरात 10 रुपयांची किंचित वाढ झाली आहे. खरंतर सोनं हे महागाईच्या विरोधात एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं, म्हणूनच गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सोन्याकडे आकर्षित होत आहेत.
MCX वर सोनं सुळक्कन घसरलं खाली
आज कमोडिटी बाजारात सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात घसरण झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव 2279 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम साठी 1 लाख 51 हजार 429 रुपये झाला. तर चांदीचा भाव 10,501 रुपयांनी घसरून 2 लाख 33 हजार 300 प्रति किलो इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव जाणवला. यूएस कॉमेक्सवर सोन्याचा भाव 94.90 डॉलर ने घसरून प्रति औंस 4688.30 झाला, तर चांदीचा भाव 3.76 डॉलरने घसरून प्रति औंस 72.32 डॉलर्स प्रति औंस झाला.
24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव
गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव प्रति ग्रॅम 15296 रुपयांवर आहे. हे 99.9 % शुद्ध सोने असून गुंतवणुकीसाठी हा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. एक दिवसापूर्वी याचा भाव 15,296 रुपये होता, म्हणजेच आज त्यात 1 रुपयाची वाढ झाली आहे. आता प्रति 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळ्याचा भाव 1 लाख 52 हजार 960 रुपये इतका आहे. मोठ्या खरेदीसाठी, तब्बल 100 ग्रॅमचा दर 15 ला 29 हजार 600 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
22 कॅरेट सोन्याचा वापर सामान्यतः दागिने बनवण्यासाठी केला जातो. आज त्याचा भाव प्रति ग्रॅमसाठी 14 हजार 021 रुपये इतका असून त्यांध्येही 1 रुपयाची वाढ झाली आहे. त्याची शुद्धता 91.6 टक्के असल्यामुळे हे सोनं दागिन्यांसाठी अधिक टिकाऊ ठरतं. लग्नसमारंभ आणि सणासुदीच्या काळात या सोन्याला सर्वाधिक मागणी असते.
देशाती प्रमुख शहरातील सोन्याचे दर (City wise Gold Price)
आज देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये अगदी थोडासा फरक दिसून आला. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 15, 328 रुपये प्रति ग्रॅम, 22-कॅरेटचा 14,051 रुपये आणि 18 कॅरेटचा 11,711 रुपये होता. मुंबई, कलकत्ता, बंगळूर, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 24 -कॅरेट सोन्याचा भाव15,296 रुपये, 22-कॅरेटचा 14,021 रुपये आणि 18 -कॅरेटचा 11,472 रुपये प्रति ग्रॅम होता. दिल्लीमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा भाव 15,311 रुपये, 22 -कॅरेटचा 14,036 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 11,487 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे.