डोनाल्ड ट्रम्प यांची नुसती बडबड, इराणने थेट करून दाखवले, काही मिनिटातच..
GH News April 02, 2026 02:13 PM

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा केली जाईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडले. उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यात इराणवरील हल्ले अधिक घातक करू म्हटले. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम सर्वच देशांवर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले अधिक घातक करू म्हटल्यावर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. बॅरलच्या किमतीत वाढ झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, होर्मुज खाडी खुली केल्यानंतर आपोआप तेलाच्या किमती कमी होतील. हेच नाही तर त्यांना होर्मुज खाडीची गरज नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक देश संकटात असून कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजच्या मुद्द्यात हातवर केल्याचे बघायला मिळतंय. 21 युद्धनाैकांनी इराणला अमेरिकेने वेडले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यात इराणवरील हल्ले अधिक घातक होतील, असे म्हटल्यानंतर इराणने थेट मोठी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे फक्त बोलूनच नाही तर इराणकडून थेट अॅक्शन घेत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा संदेश देण्यात आला. युद्ध थांबवण्याची मागणी जग करत असताना युद्ध अधिक भडकले आहे.

इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर थेट इस्त्रायलवर मोठा क्षेपणास्त्र मारा करत हल्ला केला. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर लगेचच हा हल्ला झाला. एकप्रकारे इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना संदेश देणयात आला की, या आम्ही देखील मैदानात आहोत.

आतापर्यंतच्या या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली. इराण युद्धात मागे पडल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक दावे केले. अमेरिका विजयाच्या अत्यंत जवळ असल्याचे त्यांनी म्हटले. इराण देखील खंबीरपणे उभा असल्याने युद्ध अधिक लांबण्याचे मोठे संकेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.