Samruddhi Mahamarg Utility Corridor : आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने सध्या पाईप गॅसवर भर दिला आहे. तसेच त्या दृष्टीने समृद्धी महामार्गाच्या बाजूने समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) बांधकामाच्या वेळीच सरकारने मुंबई ते नागपूर अशी 694 किमी लांब नैसर्गिक गॅस वाहून नेणारी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं असून GAIL ( Gas Authority of India Ltd.) या कंपनीने पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण केलं आहे. हा प्रकल्प 'पीएम गती शक्ती' योजनेचा एक भाग आहे. ही पाईपलाईन देशातील पहिली सर्वात मोठी पाईपलाईन आहे जी महामार्गासोबत 'युटिलिटी कॉरिडॉर' मध्ये बसवली गेली आहे. त्यामुळे फक्त तीन मीटर रुंदीच्या पट्ट्यात ही पाईपलाईन मुंबई ते नागपूर टाकण्यात आली आहे.
Utility Corridor : युटीलिटी कॉरिडॉरमध्ये पाईपलाईन बसवल्याने कोणते फायदे?
-जमीन अधिग्रहण अतिशय कमी झालं.
-पाईपलाईन टाकण्यासाठी खर्च कमी झाला
-भविष्यातील प्रकल्पांसाठी आदर्श मॉडेल तयार झालं.
सुमारे 24 इंच व्यास असलेली ही पाईपलाईन प्रति दिवस 1.65 कोटी SCM (Standard Cubic Meter ) इतका गॅस वाहून नेणार आहे. त्यामुळे उच्च क्षमतेची ही पाईपलाईन राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
या पाईपलाईनमुळे राज्याला कुठले फायदे होतील? (Samruddhi Mahamarg Utility Corridor)
-घरगुती वापरासाठी लागणारा गॅस (PNG ) सुमारे 95 लाख घरांना पाईपलाईन द्वारे गॅस मिळू शकतो.
-महामार्गालगतच्या जिल्ह्यांमध्ये वाहनांसाठी सीएनजी उपलब्ध होणार. अनेक ठिकाणी प्रथम सीएनजी पोहोचणार.
-उद्योग विकास - MIDC व औद्योगिक क्षेत्रांना स्वस्त व सुरक्षित गॅस उपलब्ध होणार त्यामुळे रोजगार व गुंतवणुकीत वाढ होणार.
-पर्यावरणासाठी फायदा होणार, LPG व डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषण होणार.
-पीएम गति शक्ती योजनेचा भाग असल्याने रस्ता व ऊर्जा अशी एकत्रित पायाभूत सुविधा भविष्यात अशा पाईपलाईन टाकण्याचा मार्ग मोकळा झालाय.
त्यामुळे समृद्धी महामार्ग लगतची ही गॅस पाईपलाईन भविष्यात राज्याची व विदर्भाची जीवन वाहिनी बनू शकते..! ही पाईपलाईन फक्त गॅस वाहतुकीसाठी नसून महाराष्ट्रातील ऊर्जा उद्योग व वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडवणारा प्रकल्प असल्याचा समोर येईल..
सर्वसामान्यांना हा गॅस कधी उपलब्ध होईल?
उपलआता महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित राहतो की गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी सर्वसामान्यांना हा गॅस कधी उपलब्ध होईल? तर 'गेल इंडिया'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर "एबीपी माझा" ला सांगितलं की, सर्वसामान्यांना गॅस मिळण्यासाठी अजून चार ते पाच वर्षे लागतील. कारण या ठिकाणी गॅस स्टेशन उभारणे, विविध शहरात आणि गावात गॅस पाईपलाईन टाकण्याचं नेटवर्क तयार करणे, सुरक्षितता तपासणी इत्यादी गोष्टी अजून काम बाकी असल्याने साधारणता पाच ते सहा वर्ष या पाईपलाईनचा सर्वसामान्यांना फायदा होण्यासाठी लागणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या गॅस पाईपलाईन मुळे आतापासूनच समृद्धी महामार्ग लगत असलेल्या गावातील तरुणांमध्ये मोठा उत्साह व कुतूहल ही निर्माण झाल आहे. कारण त्यांना भविष्यात या गॅस पाईपलाईन पासून मोठा फायदा होणार असल्याचं हे तरुण सांगत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या