कोल्हापूर : वेंगुर्ला, देवगड, कुणकेश्वर, विजयदुर्ग, पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर, खेडर, बाणकोट, मंडणगड आदी परिसरात मोजकाच हापूस शिल्लक (Hapus Mango Supply) आहे. कोकणपट्ट्यातून कोल्हापुरात येणाऱ्या हापूस आंब्याची आवक कमी होऊ लागल्यामुळे कोल्हापूरच्या बाजारात आतापर्यंत १५ टक्केच हापूसची आवक झाली आहे.
तीन वर्षांतून एकदा हापूसची आवक ही कमी होते, असे काही व्यापारी, विक्रेत्यांनी सांगितले. या वर्षी झाडांवर कैऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून, हापूसचे उत्पादन ७०/८५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. हे उत्पादन आणखी घटेल.
King Cobra in Sindhudurg : कोकणात 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित मार्गावर आढळला 7 फुटी 'किंग कोब्रा'; तळकटच्या जंगलात पिलांचाही वावर असण्याची शक्यताकोकण विभागात आंब्यांना दोन ते तीनवेळा मोहोर येतो, मात्र पुढील बहरावर परिणाम होण्याची शक्यता असून, मार्चमध्ये दिवस अन् रात्रीच्या तापमानात २५ अंशांपेक्षा जास्त फरक पडला. उष्णता वाढल्याने तयार छोटे आंबा फळांची गळती झाली.
नेमके काय झाले?अतिथंडीमुळे परागीभवन करणारे कीटक
फुलोऱ्यापासून दूर
किटकांनी परागीभवन केलं; पण फळधारणेवर परिणाम
मार्चच्या मध्यावर रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून हापूसचे प्रमाण कमी
थंडीमुळे परागीभवनाच्या प्रक्रियेवर परिणाम
दोन-तीन महिने तापमान १३ अंशांखालीच
गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस, नंतर थंडी
अनेक बागांमधील मोहोर करपून सुकला