Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता गौरव मोरेने गुपचूप लग्न उरकलं. अभिनेत्री ऋतुजा बागवेने शेअर केलेल्या पोस्टमुळे गौरवच्या लग्नाची बातमी सगळ्यांना समजली. त्यातच आणखी एक गुड न्यूज गौरवने दिली आहे. त्याने पवईतील त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
गौरवने पवईमध्येच नवीन टू बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. नुकताच त्याचा गृहप्रवेश सोहळा पार पडला. सोशल मीडियावर गौरवच्या नव्या घराची झलक चर्चेत आहे.
गौरवने त्याची ओळख असलेली फिल्टरपाड्याचा बच्चन ही पाटी घराच्या दाराबाहेर लावली आहे. याशिवाय पेस्टल ग्रीन आणि पांढऱ्या रंगात घराचं इंटीरियर करण्यात आलं आहे. गौरवच्या घरातील गृह्प्रवेशाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. राजश्री मराठी चॅनेलवर गौरव मोरेंच्या घराची झलक शेअर करण्यात आली.
View this post on InstagramA post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)
अनेकांनी गौरवचं भरभरून अभिनंदन केलं. याशिवाय शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेही उपस्थित होत्या. सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीत त्याने गौरवचं अभिनंदन केलं आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनेक कलाकारांनी गौरवच्या घरी गृह्प्रवेशला हजेरी लावली होती.
View this post on Instagram
म्हाडाच्या लॉटरीमधून गौरवला हे घर मिळालं आहे. घराचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तो खुश होता. सोशल मीडियावर "ताडपत्री ते फ्लॅट)
फ़िल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो,पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असाव हे कायम मनात होत.लहानपणापासुन वाटत होत जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खरया अर्थाने सत्यात उतरलं आणि काल दिनांक२५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवई च्या नवीन घराचा ताबा मिळाला.
ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आल आणि वाटल आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केल.माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही." ही पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.