सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 06, 2026 08:13 PM

Prakash Kunte New Marathi Film: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Industry) सध्या विविध विषयातील चित्रपटात तयार करण्यात येत आहे. दिग्दर्शकांकडून (Prakash Kunte) खास प्रेक्षकांसाठी नवनवीन प्रयोग केले  जात आहे.  बदलत्या काळानुसार, मराठी सिनेसृष्टीतही (Entertainment News) विविध विषयाला हाताळून चित्रपट तयार केले जात आहे. अशातच  मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे लवकरच एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हंपी या चित्रपटातून  दिग्दर्शक प्रकाश कुंटे हे प्रकाशझोतात आले होते.  आता लवकरच प्रकाश कुंटे नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असून,  ठाण्यात या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. 

'हंपीनंतर प्रकाश कुंटेंचा नवा चित्रपट' (Prakash Kunte New Film)

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार डंका गाजवला आहे.  आशयविषय, सादरीकरणाच्या चौकटी मोडून मराठी चित्रपट नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवनवीन लोकेशन्स आणि त्या अनुषंगानं कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. अनोखे विषय हाताळणारे दिग्दर्शक अर्थात प्रकाश कुंटे आता एक नवा कोरा कौटुंबिक चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून, चित्रपटाचा मुहूर्त नुकताच ठाणे येथे संपन्न झाला आहे. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नव्या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by marathimanoranjan (@marathimanoranjan252025)

मनस्मिता प्रॉडक्शन आणि स्वरूप स्टुडिओज हे या आगामी चित्रपटाची निर्मिती करणार असून, डॉ. स्मिता नलावडे आणि मंगेश नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर  सचिन नारकर, विकास पवार आणि प्रभाकर परब हे सहनिर्माते आहेत. आजवर अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती स्वरूप स्टडिओज यांनी केली आहे. चित्रपटाची कथा नितिश बुधकर यांची आहे. तर,  पटकथा-संवाद नितिश बुधकर, आदित्य प्रकाश भगत आणि विभव राजाध्यक्ष यांची आहे. 

विव्हियन गायकवाड हे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत. तर,  चित्रपटाचे संगीत रोहित राऊत करणार आहे. अतुल साळवे हे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. लवकरच कलाकारांची नावे जाहीर करण्यात येणार असून, दमदार कलाकारांची फळी भेटीस येणार असल्याचे समजते. प्रकाश कुंटेने आजवर हाताळलेले विषय हे मनाला भिडणारे होते. त्यामुळे या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश नक्की कोणती गोष्ट मांडणार, याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे यात शंका नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.