Shah Rukh Khan in serious discussion during KKR match : कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयाचे खाते उघडता आलेले नाही. इडन गार्डनवरील लढत पावसामुळे वाया गेली आणि पंजाब किंग्सविरुद्ध त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली KKR ला आयपीएल २०२६ मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि यामुळे संघमालक शाहरुख खान व सीईओ वेंकी मैसूर यांच्यात गंभीर चर्चा झालेली पाहायला मिळाली. यावरून KKR च्या ताफ्यात लवकरच 'खेला होबे' अशी चर्चा रंगली आहे.
कोलकाताने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. पावसाची शक्यता असूनही अजिंक्य रहाणेने घेतलेल्या या निर्णयावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनवरील निवडीवरूनही बरीच चर्चा रंगलेली आहे आणि आयपीएलच्या पर्वातील आगेकूच करण्यासाठी कोलकाताला आता पुढील सामन्यांत दमदार कामगिरी करून विजय मिळवावा लागणार आहे. अशाच आजच्या सामन्यात घरच्या मैदानावरही एक गुणावर समाधान मानावे लागल्याने संघ मालक शाहरुख खान व सीईओ यांच्या काहीतरी गंभीर चर्चा रंगल्याचे दिसले.
IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?कोलकाताने दुसऱ्या षटकात दोन विकेट्स गमावल्या. फिन अॅलन व कॅमेरून ग्रीन यांना पुन्हा अपयश आल्याने कोलकाताची अवस्था २ बाद १६ अशी झाली होती. पाऊस आला तेव्हा KKR च्या ३.४ षटकांत २ बाद २५ धावा होत्या. जवळपास दोन तास पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आणि पंजाब व कोलकाता यांना प्रत्येकी १ गुण दिले गेले. यामुळे पंजाब ५ गुणासह IPL 2026 Point Table वर अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर कोलकाताचा तीन सामन्यानंतर फक्त १ गुण झाला आहे.
दरम्यान, शाहरुख व सीईओ यांच्यातल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेचे कर्णधारपद जाण्याची चर्चा रंगली आहे. KKR च्या ताफ्यात काहीतरी मोठं घडेल असा तर्क लावला जात आहे.