DC vs GT Live Streaming : गुजरातसमोर दिल्लीचं आव्हान, सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखणार?
GH News April 08, 2026 03:09 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात बुधवारी 8 एप्रलिला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. दिल्ली या मोसमात अजिंक्य आहेत. तर गुजरातला अद्याप विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. दिल्लीने आपल्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. गुजरातला आपल्या मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सने पराभूत  केलं आहे. त्यामुळे गुजरातसमोर आपल्या तिसऱ्या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळून दिल्लीला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.