जग पुन्हा वसाहतवादाकडे जात आहे! उदय कोटक यांचे मोठे विधान
Marathi April 08, 2026 09:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आखातातील संघर्ष थंडावला आहे. आता या युद्धात अमेरिकेचा विजय झाला की इराणने वर्चस्व सिद्ध केले, याबाबतच्या चर्चा होत आहे. मात्र, या चर्चेपेक्षा एका वेगळ्या मुद्द्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. आता आपण पुन्हा वसाहतवादाकडे जात आहोत, असे विधान करत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा संदर्भ देत त्याचा अर्थही स्पष्ट केला.

उदय कोटक म्हणाले की, मी राजकारणाबाबत भाष्य करत नाहीये; मी केवळ व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाषणातील वस्तुस्थितीची पुनरावृत्ती करत आहे. ट्रम्प यांनी दोन मुद्दे मांडले, ज्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की आपण एका अत्यंत वेगळ्याच जगाकडे वाटचाल करत आहोत. पहिला मुद्दा म्हणजे, जो कोणी युद्ध जिंकतो, त्यालाच युद्धातील लूट मिळते, आणि दुसरा मुद्दा म्हणजे, जर आपल्याला ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) नियंत्रण मिळाले, तर आपण म्हणजेच अमेरिका त्यासाठी भाडे आकारू. त्यांच्या या विधानावरून आपण वसाहतवादाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते, असे कोटक म्हणाले.

आपण पुन्हा एकदा वसाहतवादाच्या जगाकडे वळत आहोत, असा इशारा देत त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या माधअयमातून जगभर प्रवास केला. मसाले, कापड यांचा व्यापार करत ते शस्त्रांच्या व्यापारावर आले. देशातील राजे आणि संस्थानिकांना शस्त्रांची विक्री करत त्यांनी प्रचंड नफा कमावला. त्यानंतर शस्त्रे आणि तंत्रज्ञान याच्या जोरावर त्यांनी राज्यांवर नियंत्रण मिळवले. अशाप्रकारे ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर नियंत्रण प्रस्थापित केले होते. आता आपण तशाच जगात प्रवेश करत असल्याचा धोक्याचा इशाराही कोटक यांनी दिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.