इराणी महिलेच्या प्रेमाखातर औरंगजेबने बांधला स्वस्तातला ताजमहल
esakal April 09, 2026 03:45 AM
औरंगजेबने

मुघल सम्राट औरंगजेबने एका इराणी महिलेच्या प्रेमाखातर चक्क ताजमहल बांधला होता. पण हा ताजमहल खऱ्या ताजमहलापेक्षा खूप छोटा आणि कमी बजेटमधला होता.

ताजमहल

हा ताजमहल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बीबी का मकबरा आहे. सध्याचं छत्रपती संभाजी नगर आणि पूर्वीचं औरंगाबाद येथे हा बीबी का मकबरा आहे.

बीबी का मकबरा

दिलरास बानो ही औरंगजेबची पहिली आणि सर्वात लाडकी पत्नी होती. बीबी का मकबरा येथे दिलरास बानोची कबर आहे.

दिलरास बानो बेगम

दिलरास बानो बेगम ही मूळची इराणच्या (पर्शिया) सफाविद राजघराण्यातील राजकन्या होती. जन्म १६२२ चा.

मुघल दरबार

दिलरास बानोचे वडील मुघल दरबारात उच्च पदावर होते आणि गुजरातचे सुभेदारदेखील होते. तर आईचं नाव नौरस बानो बेगम असं होतं.

आमझ शाह

बीबी का मकबरा बांधण्याची परवानगी आणि खर्चाला मंजुरी औरंगेजबने दिलेली होती. पुढे त्याचा मुलगा आमझ शाह याने आईच्या स्मरणार्थ मकबऱ्याचं काम पूर्ण केलं.

हंसपत राय

या वास्तूची रचना 'अता-उल्ला' (ताजमहालच्या वास्तुविशारदाचा मुलगा) आणि इंजिनिअर 'हंसपत राय' यांनी केली होती.

७ ते १० लाख रुपये

ताजमहाल बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले होते, मात्र बीबी का मकबरा बांधण्यासाठी त्या काळी साधारणपणे ७ ते १० लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.

संगमरवरी

याचे बांधकाम साधारणपणे इ.स. १६६० ते १६७९ च्या दरम्यान झाले. मकबऱ्याचा मुख्य घुमट संगमरवरी आहे, परंतु इतर भाग हा प्लास्टर आणि दगड वापरून बनवला आहे.

Mughal Harem

हरममधल्या 'या' दोन इराणी महिलांमुळे मुघल साम्राज्य झालं बळकट येथे क्लिक करा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.