पवई येथील आरे कॉलनी क्रमांक तीन मधील वस्तीमध्ये आज पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी बिबट्या वस्तीमध्ये फिरताना पाहिल्याचे सांगितले असून सर्वत्र सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरे कॉलनीला लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्यामुळे वारंवार वन्य प्राणी वस्तीच्या दिशेने येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dr. Ambedkar Jayanti : कोल्हापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापनाकोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती प्रबोधनात्मक, वैचारिक पातळीवर साजरी व्हावी, यासाठी आंबेडकरी समाज संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना झाली. समिती अध्यक्षपदी अनिल धनवडे, कार्याध्यक्षपदी रुपा वायदंडे, उपाध्यक्षपदी बाजीराव नाईक, बबन शिंदे यांची निवड जाहीर केली. शाहू स्मारक भवन येथे प्रा. शहाजी कांबळे, बी. के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशीलकुमार कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कार्यकारिणीत सचिव संजय जिरगे, नियोजन कार्यप्रमुख दत्ता मिसाळ, सतीश माळगे, सहसचिव बटू भामटेकर, सदस्य म्हणून मल्लिक चिकदुळ यांची निवड केली. नंदकुमार गोंधळी, शिवाजीराव आवळे, मच्छिंद्र कांबळे, आर. के. कांबळे, विद्याधर कांबळे, दिलीप मोहिते, ॲड. दत्ताजीराव कवाळे, प्रशांत चांदणे, भाऊसाहेब काळे, जयसिंग जाधव, मधुकर शिर्के, प्रा. अशोक आळतेकर, बाबासाहेब पाटोळे, संदीप हेर्लेकर यांचा समितीत समावेश आहे.
Nilesh Lanke : लंकेंविरोधातली डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळलीअहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी फेटाळून लावली. प्रतिवादी नीलेश लंके यांनी 'ऑर्डर ७, रूल ११' अंतर्गत सादर केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करून डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळली. विखे यांच्या याचिकेत लंकेंनी निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप केला होता. लंके यांनी प्रचारादरम्यान विखे-पाटील कुटुंबाच्या वैयक्तिक चारित्र्यावर खोटी विधाने केल्याचे याचिकेत म्हटले होते. तसेच, लंके यांनी निवडणूक खर्चाची मर्यादा ओलांडली, मतदानात बोगसगिरी केल्याचे याचिकेत म्हटले होते.
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातवर चौदावा गुन्हा दाखल; सिन्नर पोलिसांकडून तपास सुरूभोंदू अशोक खरातवर चौदावा गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नरच्या मिरगावमधील जमीन खरेदीप्रकरणी फसवणूक केल्याने अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल झालाय. माळी बंधूंकडून कवडीमोल भावात कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली. तुम्ही जमीन विकली नाही तर, 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी केली बतावणी केली होती. माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातने हडप केली. सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Ravindra Chavan : भाजपची विचारधारा गावोगावी पोहोचवा - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणकागल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची विचारधारा गावोगावी पोहोचवून संघटनात्मक ताकद वाढवा. समरजितसिंह घाटगे यांच्यामुळे संघनात्मक ताकद बळकट होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांिगतले. मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या सोहळ्यात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Stock Market : शेअर बाजारात उधाण; सेन्सेक्स २९४६ अंशांनी वाढलामुंबई : अमेरिका-इराण यांच्यात दोन आठवड्यांची युद्धबंदी झाल्याने आज भारतीय शेअर बाजार जवळपास चार टक्क्यांच्या आसपास उसळले. सेन्सेक्स २९४६.३२ अंश तर निफ्टी ८७३.७० अंश वाढला. युद्धबंदी होण्याच्या शक्यतेमुळे गेले पाच दिवस भारतीय शेअर बाजार वाढत आहेत. मात्र आज त्याने मागील तोटा मोठ्या प्रमाणावर भरून काढला. आजच्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण मालमत्तांचे मूल्य सोळा लाख कोटी रुपयांनी वाढले. काल हे मूल्य ४२९ लाखकोटी रुपये होते. आज ते ४४५ लाख कोटी रुपये झाले.
12th Grade Exam Results : कर्नाटकात आज बारावी परीक्षेचा निकालबंगळूर : कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (केएसईएबी) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा-१ चा निकाल उद्या (ता. ९) जाहीर होणार आहे. मंडळाच्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा निकाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाच्या ‘बारावी परीक्षा-१’ २८ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान राज्यभर झाल्या. परीक्षेसाठी सात लाख १० हजार ३६३ विद्यार्थी नोंदणीकृत होते. राज्यातील १,२१७ केंद्रांवर परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आल्या.
Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाफेड आणि NCCF करणार कांद्याची आगाऊ खरेदीकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाफेड आणि NCCF कांद्याची आगाऊ खरेदी करणार आहे. नाफेड आणि NCCF प्रत्येकी १ लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे. पुढील काही दिवसातच बफर स्टॉकसाठी दोन्ही संस्थांकडून कांदा खरेदीला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मंत्री गटाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने दिली.
Kerala, Assam and Puducherry Election : केरळ, आसामसह पुद्दुचेरीत आज एकाच टप्प्यात मतदान; सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवातLatest Marathi Live Updates 09 April 2026 : केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज (ता. ९) एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.