परळी वैजनाथ :परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील लघू सिंचन प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी परळी -अंबाजोगाई मार्गावर कन्हेरवाडी परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली.
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजेभाऊ फड यांनी दिला आहे.कन्हेरवाडी लघू सिंचन प्रकल्पातील पाणी दरवर्षी उन्हाळ्यात नदीपात्रात सोडले जाते.यामुळे परिसरातील गुरांची सोय होते शिवाय कन्हेरवाडी जिरेवाडी,बँक कॉलनी,जलालपूर,आदी भागातील नागरिकाच्या बोरला पाणी येते.विहिरीची पाणी पातळी वाढते.तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.त्यामुळे या मागणीसाठी गुरुवारी कन्हैरवाडी येथे परळी -अंबाजोगाई मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ग्रामस्थ परिसरातील नागरीक, विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विविध मागण्याचे निवेदन यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या 20 एप्रिलला पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
कन्हेरवाडीत झालेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झालीहोती.या आंदोलनात प्रकाश मुंडे, बाबा शिंदे,मिनीनाथ फड, रामहरी फड, प्रसेनजीत रोडे गुणाजी फड शिवाजीराव नागरगोजे अरुण सपाटे,शिवाजी मुंडे,सुरेश फड अमोल रोडे, प्रशांत रोडे,प्रल्हाद गीते, ज्ञानेश्वर फड,समाधान मुंडे, धीरज फड,शिवम फड, राजेश मुंडे यांच्यासह ग्रामस्थ,कार्यकर्ते,नागरिक सहभागी झाले होते.