MNS Mira Road Attack मिरा रोड : मिरा रोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरात मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यावर मारहाण (Mira Road Crime) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारदार स्वप्निल तपासे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रामदेव पार्क, भाजी मंडईसमोर सुरू असलेल्या खोदकामाची पाहणी करण्यासाठी तपासे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत गेले होते. यावेळी ते व्हिडिओ शूट करत असताना रावण ठाकूर हा अचानक तिथे आला आणि वाद घालत त्यांना धमकावू लागला.
Mira Road Crime: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, वादवाढल्यानंतर आरोपीने दगड उचलून तपासे यांच्या दिशेने फेकला, जो त्यांच्या कानावर लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच नवीनसिंह ठाकूर, कृष्णा सिंह, गोलू सिंह आणि इतर काही अनोळखी इसमांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी तपासे यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी चाकू ही आणल्याच तक्रारीत म्हटलं आहे. या मारहाणीत तपासे जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनाही धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मात्र, या घटनेमुळे मिरा रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या या वाद आणि नंतर मारहाणीच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
BMC : मुंबई महानगरपालिकेत डिजिटल उपस्थिती प्रणाली लागू करण्याची मागणी
मुंबई महानगरपालिकेतील कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल उपस्थिती प्रणाली लागू करण्याची मागणी पुढे आली आहे. नगरसेवक झमीर कुरेशी यांनी यासंदर्भात महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र देत ही मागणी केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सध्या सभागृह तसेच विविध समित्यांच्या बैठकींमध्ये उपस्थिती नोंदवण्याची पद्धत जुनी असून त्यात अनेक त्रुटी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे बायोमेट्रिक किंवा RFID आधारित डिजिटल प्रणाली लागू केल्यास उपस्थितीची अचूक नोंद होईल. यामुळे कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढेल, कागदोपत्री काम कमी होईल आणि वेळेचीही बचत होईल, असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनाने या प्रस्तावावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या