मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
GH News April 10, 2026 11:15 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचे सर्वकाही होर्मुज खाडीत येऊन अडकले आहे. इराणच्या होर्मुज खाडीतून दररोज 15 जहाजे आरामात निघू शकतात. पण या जहाजांना होर्मुज खाडी पार करण्यापूर्वी इराणची परवानगी घ्यावी लागेल. इराणची परवानगी असल्याशिवाय एकही जहाज होर्मुजमधून जाऊ शकत नाही. भारताचा झेंडा असलेले जहाज ग्रीन आशा होर्मुज खाडीतून निघाले. यात 15,400 टन एलपीजी गॅस असल्याची माहिती मिळत आहे. हे जहाज मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीला पोहोचले. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, होर्मुज खाडी वापरण्याकरिता ओमान आणि इराण फिस घेत आहे. या युद्धापूर्वी होर्मुज खाडीच्या वापराकरिता कोणत्याही प्रकारची फिस नव्हती. भारताचे 15 जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. मात्र, या पूर्ण जहाजांना खाडी ओलांडण्याची परवानगी देण्यात आली नाही.

दोन आठवड्यांच्या युद्धबंदीनंतरही इराणकडून होर्मुज खाडी पूर्ण खुली करण्यात आली नाही. पाकिस्तानमध्ये शनिवारी बैठक आहे. या बैठकीत युद्धबंदी करार होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मागील 24 तासांमध्ये होर्मुज खाडीतून 1 तेल जहाजाला आणि 5 इतर जहाज गेले आहेत. इराणचा झेंडा असलेले दोन तेल जहाजही होर्मुजमधून गेले. होर्मुज खाडीत इराण पैसे वसूल करत असल्याने भारताचेही टेन्शन वाढले आहे.

कारण भारतात एलपीजी गॅस आणि कच्चे तेल होर्मुज मार्गेच दाखल होते. भारताला आता इराणला होर्मुजसाठी मोठा पैसा द्यावा लागणार आहे. मात्र, होर्मुज खाडीत इराणकडून नक्की किती रूपये फिस आकारली जात आहे, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. अमेरिकेने या शुल्काला विरोध केला. इराणने तात्काळ होर्मुज खाडीत पैसा वसूल करणे बंद करावे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

इराणकडून होर्मुज खाडीतून जाणाऱ्या सर्वच जहाजांकडून पैसे घेतले जात आहेत. इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी होर्मुज खाडीतून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नव्हते. यासोबतच अजूनही इराणच्या परवानगीशिवाय कोणत्याही देशाच्या जहाजाला होर्मुज खाडी वापरता येणार नाही. इराणने म्हटले की, आम्ही आमच्या मित्र देशांकरिता होर्मुज खाडी खुली ठेवली आहे. दुश्मन देश आणि त्यांना मदत करणाऱ्यांकरिता खाडी बंद आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.