पुण्यातील कॅम्प भागात डॉ. कोयाजी रोड आणि मोलेदिना रोड जेथे एकत्र येतात, त्या 'मराठा वॉर मेमोरियल' परिसरात ही ऐतिहासिक तोफ आहे.
फतेह कुशा
'फतेह कुशा' ही तोफ मुघल बादशहा औरंगजेबाच्या तोफखान्यातील असून, ती औरंगजेबासाठीच तयार करण्यात आली होती.
वजन
या ऐतिहासिक तोफेचे एकूण वजन ३ टन ९०२ किलोग्रॅम इतके असून ती आजही सुस्थितीत आहे.
पर्शियन भाषेत 'कुशादन' म्हणजे उघडणे; 'फतेह कुशा' याचा अर्थ 'विजय मिळवणारी' किंवा 'विजयाची द्वारे उघडणारी' तोफ असा होतो.
तोफेवरील फारसी लेखानुसार हिजरी सन १०७८ मध्ये, म्हणजेच साधारण इ.स. १६६७-६८ मध्ये या तोफेची निर्मिती झाली.
अरब कारागिर
ही तोफ 'मोहम्मद अली' नावाच्या एका निष्णात अरब कारागिराने मुघल साम्राज्यासाठी तयार केली होती.
दारूगोळा
तोफेवरील लेखानुसार, यात १२ शेर वजनाचा लोखंडी गोळा आणि ४ शेर दारूगोळा वापरला जाई (अकबरकालीन वजन मानकानुसार).
इतिहास संशोधक
ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी सर्वप्रथम या तोफेचे वाचन केले, तर अलीकडे निखिल परांजपे यांनी हा इतिहास नव्याने प्रकाशात आणला.
जतन
१९५७ सालापासून दुर्लक्षित असलेल्या या तोफांच्या जतनासाठी आणि वारसा जपण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जात आहेत.
युद्धशास्त्राचा नमुना
कॅम्प भागात फिरताना या मध्ययुगीन युद्धशास्त्राचा नमुना असलेल्या ३ तोफा आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
हरममधल्या 'या' दोन इराणी महिलांमुळे मुघल साम्राज्य झालं बळकट येथे क्लिक करा