Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
Tv9 Marathi April 11, 2026 12:45 AM

आपल्यासोबत असं अनेकदा घडतं की सगळं सुरळीत सुरू असतं, मात्र त्यानंतर प्रगतीला अचानक ब्रेक लागतो, आपल्यासोबत सर्व गोष्टी उलट्या घडू लागतात. आपली महत्त्वाची कामं अडकून पडतात. त्यामध्ये काही न काही अडचणी निर्माण होतात. अचानक एखादी मोठी आर्थिक समस्या निर्माण होते, व्यावसाय जर नफ्यात सुरू असेल तर त्यामध्ये देखील तोटा होतो. आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी घडून येत नाहीत. घर देखील अशांत बनतं, काहीही कारण नसताना घरात सतत वाद सुरू होतात. अशावेळी आपण सहज म्हणून जातो की काय माहिती कोणाची नजर लागली. मात्र यावर देखील वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचं सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होतं. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सतत जवळ ठेवल्या तर त्यामुळे कधीही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.

विलायची – वास्तुशास्त्रात विलायचीला अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. जर तुमच्याजवळ विलायची असेल तर त्यामुळे तुमचं मन शातं राहतं, तसेच तुमच्या मनात जे सतत नकारात्मक विचार येतात ते येत नाहीत, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार विलायचीला सकारात्मक ऊर्जेला स्त्रोत मानलं जातं. तुम्ही जेव्हा घरातून कुठेही बाहेर जाण्यासाठी निघता किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडणार असाल तर अशावेळी तुमच्या पाकिटात दोन ते तीन विलायची ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला तुमच्या कामात यश मिळतं. तसेच तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून संरक्षण होतं.

हनुमान चालीसा – हनुमान चालीसाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात देखील हनुमान चालीसाला सर्वात शक्तिशाली माण्यात आलं आहे. जर तुमच्या जवळ सतत हनुमान चालीसा असेल तर कोणत्याही नकारत्मक शक्तीचा कधीच तुमच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होतं आणि हनुमानांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो.

चांदीचं नाणं – वास्तुशास्त्रात चांदीच्या नाण्याला अत्यंत सकारात्मक माण्यात आलं आहे. जर तुमच्या पाकिटात चांदीचं नाणं असेल तर तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.