IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...
esakal April 11, 2026 04:45 AM

IPL orange cap race latest update Vaibhav Suryavanshi leading : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयी चौकार मारताना आयपीएल गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर RR ने ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात २६ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकार खेचून ७६ धावांची खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला सामनावीर पुरस्कार मिळाला. या खेळीसह त्याने ऑरेंज कॅप च्या शर्यतीत गरुड झेप घेतली आहे.

RCBने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली ( ३२), रजत पाटीदार ( ६३), वेंकटेश अय्यर ( २९) व रोमारिओ शेफर्ड ( २२) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ८ बाद २०१ धावा उभ्या केल्या. जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई व ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव व ध्रुव जुरेल यांनी १०८ धावांची वादळी भागीदारी करून RR च्या विजयाचा पाया भक्कम केला.

वैभवच्या विकेटनंतर ध्रुवने मोर्चा सांभाळताना ४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावांची नाबाद खेळी केली. कृणाल पांड्या व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत RCB ला सामन्यात पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला. पण, ध्रुव व रवींद्र जडेजा ही जोडी मैदानावर उभी राहिली. जड्डूने २४ धावांची खेळी केली. राजस्थानने १८ षटकांत ४ बाद २०२ धावा केल्या. दोनशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी बचाव करण्यात RCB ला सातवेळा अपयश आले. RR ने पाचव्यांदा दोनशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे.

२०१५ मध्ये सलग पाच विजय आणि २०२४ मध्ये सलग चार विजय मिळवल्यानंतर, राजस्थान रॉयल्सने तिसऱ्यांदा आपल्या आयपीएल हंगामाची सुरुवात सलग चार किंवा अधिक विजयांनी केली आहे. २०२४ मध्ये ईडन गार्डन्सवर केकेआरकडून पराभव पत्करल्यानंतर, गट सामन्यातील प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यातील आरसीबीचा हा पहिलाच पराभव आहे.

या सामन्यानंतर वैभवला ऑरेंज कॅप देण्यात आली.
  • २०० धावा - वैभव सूर्यवंशी ( ४ सामने, २६६.६६ चा स्ट्राईक रेट)

  • १८३ धावा - यशस्वी जैस्वाल ( ४ सामने, १६३.३९ चा स्ट्राईक रेट)

  • १६० धावा - समीर रिझवी ( ३ सामने, १६१.६१ चा स्ट्राईक रेट)

  • १५५ धावा- अंगकृश रघुवंशी ( ४ सामने, १५८.१६ चा स्ट्राईक रेट)

  • १४५ धावा - ध्रुव जुरेल ( ४ सामने, १८४ चा स्ट्राईक रेट)

  • १२९ धावा - विराट कोहली ( आठव्या क्रमांकावर)

  • ११८ धावा - रोहित शर्मा ( ११ व्या क्रमांकावर)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.