आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावून एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. या सामन्यात आरसीबीच्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमारला षटकार ठोकून त्याने ही कामगिरी केली. या मोसमातील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे, जेव्हा त्याने 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक केले आहे. याआधी त्याने राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतकही केले होते.
यासह वैभव सूर्यवंशी हा 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये दोनदा अर्धशतक करणारा आयपीएल इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फक्त ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कला ही कामगिरी करता आली. याशिवाय यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, पॅट कमिन्स, रोमॅरियो शेफर्ड, युसूफ पठाण, सुनील नरेन आणि निकोलस पूरन यांनीही प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
IPL मध्ये 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक अर्धशतक करणारे फलंदाज:
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 26 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 78 धावांची शानदार खेळी केली. त्याने ध्रुव जुरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 37 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयासाठी मजबूत स्थितीत आणले.