Mamata Banerjee: सापावर विश्वास ठेवणे शक्य; भाजपवर नाही: ममता बॅनर्जी; आसाममध्ये बाहेरून मतदार आणले!
esakal April 11, 2026 11:45 AM

टेंटुलिया (प. बंगाल) : ‘‘आसाममध्ये भाजपला विजयाची खात्री नव्हती त्यामुळे, भाजपने येथील विधानसभा निवडणुकीसाठी बाहेरून लोक आणले. आसाममधील मतदारांच्या मतांवर विजय मिळेल असा भाजपला विश्वास नव्हता,’’ असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. एकवेळ सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही, असा सल्लाही उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील टेंटुलिया येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी दिला.

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

‘‘केंद्रातील भाजप सरकारच्या काळात देशातील कोणतीही यंत्रणा निष्पक्ष राहिलेली नाही, कारण भाजपने सगळ्यांनाच विकत घेतले आहे,’’ असा आरोप ममता यांनी केला. उत्तर प्रदेशातून ५० हजार लोकांनी भरलेली एक रेल्वे आसाममध्ये आणण्यात आली होती, असा दावाही त्यांनी केला.

अधिकाऱ्यांच्या बदल्या

एकवेळ सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही, असे ममता बॅनर्जी यावेळी बोलताना म्हणाल्या. ‘‘आसामप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही बाहेरून लोक आणण्यासाठी भाजप तशीच युक्ती वापरण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच नुकतीच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लवकरच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली केली. लोक, पैसा आणि अमलीपदार्थ आणले जात आहेत, पण आमचे कार्यकर्ते त्याला तोंड देतील आणि विजय मिळवतील,’’

Pune Ring Road: पुण्यातील अखेर रिंगरोड प्रकल्पाला गती; ११ गावांतील जमिनींची मोजणी पूर्ण, भरपाई दर निश्चित! ममता म्हणाल्या
  • एका वृत्तपत्रातील अहवालानुसार पश्चिम बंगालमध्ये ‘एसआयआर’च्या माध्यमातून वगळलेल्या ९० लाख नावांपैकी ६० लाख हिंदू आणि ३० लाख मुस्लिम

  • अनुसूचित जातींच्या अनेक व्यक्तींची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली

  • भाजप सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमधील लोकांच्या मांसाहारी अन्नपद्धतीवर निर्बंध घातले जातील

  • पंतप्रधान मोदी इतर राज्यांत पश्चिम बंगालच्या लोकांचे संरक्षण करू शकत नाही, पण इथल्या सभांत ‘सोनार बांगला’चे आश्वासन देतात

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.