बोईसरमध्ये स्पावर पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, तिघांना अटक
esakal April 11, 2026 11:45 AM

बोईसरमध्ये स्पावर पोलिसांचा छापा
बोईसर, ता. १० (वार्ताहर) : बोईसर पूर्वेकडील बेटेगाव परिसरातील एका स्पामध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर बोईसर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी स्पातील तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून, स्पाचा व्यवस्थापक फरार आहे. अटक आरोपींना शनिवारी पालघर येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिल्हार रस्त्यालगत असलेल्या इमारतीतील ‘निंबा वेलनेस’ या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली होती.
त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक व पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील पथकाने छापा टाकला असता स्पामध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन महिलांची सुटका करून त्यांना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये दाखल केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.