Mia Khalifa Emotional Video On Lebanon Airstrikes: इराणसोबतचे (Iran) युद्धजन्य स्थिती क्षमल्यानंतर, आता इस्त्रायलनं (Israel) आपला मोर्चा लेबनानच्या (Lebanon) दिशेनं वळवला. इस्त्रायलने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात साधारण एका दिवसात 250 हून अधिक लोकांचा नाहक बळी गेला. लेबनानमध्ये सुरु असलेल्या एअर स्ट्राईकचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. अनेक दिग्गजांनी या भीषण परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. मूळची लेबनीज आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेली सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि माजी अडल्ट स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हिनं एक ह्रदयद्रावक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिनं लेबनानमध्ये वाढत्या हिंसाचाराबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या भावनिक व्हिडीओमध्ये तिनं तेथील परिस्थिती भयावह आणि चिंताजनक असल्याचं वर्णन केलं आहे. 'लेबनानमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही हे हल्ले आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत' असं म्हणत मियाला रडू कोसळले.
मियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं या व्हिडीओतून लेबनानमधील भयावह वास्तव मांडले आहे. लेबनानमधील परिस्थितीबाबात माहिती देत असताना मियाला रडू कोसळलं. 10 मिनिटाच्या हवाई हल्ल्यात 160 हून अधिक हवाई हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात लेबनानचं प्रचंड नुकसान झालं. इमारती, शाळा, हॉस्पिटल आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं होतं. तिनं या व्हिडीओला कॅप्शन देखील दिलं आहे. 'दोन देशांमध्ये सुरु असलेले हल्ले म्हणजे दहशतवादापेक्षा कमी नाही. अमेरिका तसेच इस्त्रायल हे दोन्ही देश या युद्ध गुन्ह्यांमध्ये सामील आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल हे दहशतवादी आणि फॅसिस्ट राज्य आहेत. एके दिवशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचा हिशोब नक्कीच होईल', असा इशारा यावेळी तिनं दिला.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, मिया खलिफाचा जन्म बेरुतमध्ये झाला. आपल्या देशाचा होत असलेला विनाश पाहून तिला अश्रू अनावर झाले आहेत. तिनं व्हिडीओत स्पष्ट केलं की, 'लेबनानमध्ये सुरू असलेला हिंसाचार पाहत आहे. तसेच दुसरीकडे मी ग्लोबल सिस्टमचा एक भाग देखील आहे. मी स्वत:लाही या परिस्थितीसाठी जबाबदार धरत आहे', असं मिया खलिफा म्हणाली. 'आज माणूस अंतराळामध्ये झेप घेऊन प्रगती करत आहे. मात्र, युद्ध टाळण्यासाठी अजूनही असमर्थ आहे. कधी कधी स्वत:ला असहाय्य वाटते. पण आज आवाज उठवून इतरांपर्यंत सत्य पोहचवायचं आहे', असं मिया खलिफा म्हणाली. व्हिडीओच्या शेवटी मिया खलिफाने लेबनान लोकांसाठी पाठिंबा दर्शवला. तसेच हे सगळं कधी थांबणार? असा प्रश्नही उपस्थित केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...