मालिका प्रेमींसाठी खुशखबर! Zee मराठीने दुपारच्या मनोरंजनाची केली खास सोय, 1 ते 3 वेळ चुकवू नका
जयदीप मेढे April 12, 2026 11:13 AM

Zee Marathi: प्रेक्षकांची लाडकी झी मराठी वाहिनी(Zee Marathi) पुन्हा एकदा खास मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ या दोन नवीन संकल्पनांद्वारे चॅनेल आता दुपारपासूनच एंटरटेनमेंटचा डबल डोस देणार आहे.

आपली दुपार’मुळे दुपार होणार खास

13 एप्रिलपासून दररोज दुपारी 1 ते 3 या वेळेत ‘आपली दुपार’ हा खास स्लॉट प्रेक्षकांसाठी सुरू होणार आहे. घरातील कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी हा वेळ खास ठरणार असून, आपल्या आवडत्या मालिकांचा निवांत आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

या सत्रात सावळ्याची जणू सावली, लक्ष्मी निवास आणि
आम्ही सारे खवय्ये हे लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत साईराज केंद्रेची दमदार एंट्री होणार असून कथानकात नवं वळण येणार आहे.


‘मनोरंजनाचा Powerplay’मध्ये मालिकांचा एक्स्ट्रा तडका

यासोबतच ‘मनोरंजनाचा Powerplay’ या उपक्रमातून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. शुभ श्रावणी, वीण दोघातली ही तुटेना, तारिणी आणि देव माणूस मधला अध्याय या मालिका आता 30 मिनिटांऐवजी थेट 45 मिनिटांच्या स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कथानकाचा अधिक वेळ आनंद घेता येणार आहे.


प्रेक्षकांसाठी दुहेरी मेजवानी

‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ या दोन उपक्रमांमुळे झी मराठी प्रेक्षकांसाठी भावनांनी, उत्कंठेने आणि मनोरंजनाने भरलेला अनुभव घेऊन येत आहे. तेव्हा १३ एप्रिलपासून ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ पाहायला विसरू नका फक्त झी मराठीवर!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.