Jalgaon leopard news : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी बिबट्याने तब्बल तीन तास दहशत माजवली. शहरातील बस स्थानक परिसरात अचानक बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणात पळापळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, एका टप्प्यावर बिबट्या पिंजऱ्यातून सुटल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली.
दरम्यान, या कारवाईत स्वतः आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तरीही त्यांनी धाडस दाखवत कारवाईत सहभाग कायम ठेवला.
Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवलावनविभागाच्याअथक प्रयत्नांनंतर अखेर तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याला बस स्थानक परिसरातून जेरबंद करण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र बिबट्या पकडण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून, जखमी आमदारांवर उपचार सुरू आहेत.