LSG vs GT: जे रोहित-विराटलाही जमलं नाही, ते शुबमन गिलने करून दाखवलं; नावावर केला हा अद्भूत विक्रम!
Marathi April 13, 2026 02:24 AM

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (LSG vs GT) कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) तुफानी फलंदाजी करत एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने असा विक्रम केला आहे जो रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही जमला नाही.

शुबमन गिल आयपीएलच्या इतिहासात 4 हजार धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने फाफ डू प्लेसिसचा विक्रम मोडला आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात केवळ 25 धावा करताच त्याने हा टप्पा गाठला. आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण करणारा तो 19 वा खेळाडू ठरला असून, त्याने हा टप्पा 118 डावांमध्ये पूर्ण केला आहे.

शुबमन गिलची सरासरी 40 च्या वर असून त्याचा स्ट्राइक रेट 139.25 आहे. आतापर्यंत त्याने 4 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण केल्यानंतर, तो गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आणि हार्दिक पांड्याने संघ सोडल्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले.

काही काळ फॉर्मसाठी झगडल्यानंतर गिल आता पुन्हा जुन्या लयीत परतला आहे. दिल्लीविरुद्ध 70 आणि पंजाबविरुद्ध 39 धावा केल्यानंतर, आता लखनौविरुद्धही त्याने शानदार अर्धशतक ठोकले आहे. गुजरात टायटन्ससाठी त्यांच्या कर्णधाराचा हा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. जर गिलची बॅट अशीच तळपत राहिली, तर गुजरातला विजय मिळवणे सोपे जाईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.