मुंबईच्या वाड्यावर आरसीबीचं ‘रॉयल’; हार्दिक पांड्याच्या एका चुकीने पलटणच्या पराभवाची ‘हॅट्रिक’
Marathi April 13, 2026 03:24 AM

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा IPL 2026 वर पराभव केला: वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर शनिवारी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) यजमान मुंबई इंडियन्सचा 50 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर यंदाच्या हंगामातील पराभवाची हॅट्रिक नोंदवली गेली असून, टीम आता पॉईंट टेबलमध्ये थेट नवव्या स्थानावर फेकली गेली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय पहिल्याच षटकापासून चुकीचा ठरवला. आधी दिल्ली कॅपिटल्स, मग राजस्थान रॉयल्स आणि आता आरसीबीविरुद्ध मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे मुंबई आता पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.

फिल सॉल्ट अन् पाटीदारची वादळी खेळी, मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई

आरसीबीच्या डावाची सुरुवात फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी केली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 71 धावा केल्या. त्यानंतरही दोघांचा जोर कायम राहिला आणि 10 षटकांतच 115 धावांची भागीदारी उभारली. मुंबईला पहिला ब्रेकथ्रू शार्दुल ठाकूरने मिळवून दिला. त्याने सॉल्टला बाद केले. सॉल्टने अवघ्या 36 चेंडूत 78 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. एका बाजूला फटकेबाजी सुरू असताना विराट कोहलीने तुलनेने संयमी खेळ करत डाव सावरला. त्याने 38 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस हार्दिक पांड्याने त्याला बाद केले.

यानंतर कर्णधार रजत पाटीदारने मैदानात येताच चौकार-षटकारांची आतषबाजी सुरू केली. त्याने केवळ 20 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या डावात 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याला मिचेल सँटनरने बाद केले. शेवटच्या षटकांमध्ये टिम डेव्हिडने 16 चेंडूत नाबाद 34 धावा करत संघाचा स्कोर 240 पार नेला. जितेश शर्माने 10 धावांचे योगदान दिले. एकूणच, आरसीबीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत मुंबईसमोर 242 धावांचे आव्हान उभे केले आहे.

मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव

मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या 241 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांनी केली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र 19 धावांवर रोहित शर्मा दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेले. यानंतर सुयश शर्मा ने मुंबईच्या डावाला मोठा धक्का दिला. आठव्या ओव्हरमध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर रिकेल्टनला बाद केले. रिकेल्टनने 22 चेंडूत 27 धावा केल्या. त्यानंतर त्याच ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर तिलक वर्मा यांना केवळ 1 धावावर बाद करत मुंबईला दुसरा झटका दिला. 8 ओव्हरनंतर मुंबईची अवस्था 2 बाद 80 अशी होती. यानंतर क्रुणाल पांड्याने सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. सूर्या 22 चेंडूत 33 धावा करून माघारी परतला. चौथा झटका कर्णधार हार्दिक पांड्या यांच्या रूपाने बसला. हार्दिकने 22 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर 40 धावा केल्या. अखेर मुंबईचा डाव 222 धावांवर मर्यादित राहिला आणि त्यांना 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हे ही वाचा –

Rohit Sharma Retire Hurt : मुंबईला वाऱ्यावर सोडून रोहित शर्मा गेला मैदानाबाहेर, नेमकं काय घडलं?, रितिकाचा चेहराच सर्व काही सांगून गेला…

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.