राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला आजपासून प्रारंभ, प्रशांत मोरे-समृद्धी घाडिगावकरला अव्वल मानांकन
Marathi April 13, 2026 11:24 AM

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित 60 वी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद पॅरम स्पर्धा 13 ते 16 एप्रिलदरम्यान वाशी येथे रंगणार असून, स्पर्धेला दमदार सुरुवात होणार आहे. पुरुष एकेरीत मुंबईचा विश्वविजेता प्रशांत मोरे आणि महिला एकेरीत ठाण्याची समृद्धी घाडिगावकर यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

पुरुष, महिला, पुरुष वयस्कर व महिला वयस्कर अशा चार गटांत एकूण 486 खेळाडू सहभागी होत असून, राज्यभरातील अव्वल खेळाडूंची उपस्थिती स्पर्धेची रंगत वाढवणार आहे. एकूण 2 लाख रुपयांची पारितोषिके आणि चषक विजेत्यांची वाट पाहत आहेत.

32 आधुनिक पॅरम बोर्डस्वर होणारी ही स्पर्धा काwशल्य, अचूकता आणि दबावातील खेळाची खरी कसोटी ठरणार आहे.

स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे

पुरुष एकेरी ः 1) प्रशांत मोरे (मुंबई), 2) झैद अहमद फारुकी (ठाणे), 3) सागर वाघमारे (पुणे), 4) महम्मद घुफ्रान (मुंबई), 5) अभिजित त्रिपनकर (पुणे), 6) विकास धारिया (मुंबई), 7) संदीप दिवे (जळगाव), 8) संजय मांडे (ठाणे)

स्त्री एकेरी 1) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), 2) आकांक्षा कदम (रत्नागिरी), 3) मिताली पाठक (मुंबई), 4) अंबिका हरिथ (मुंबई), 5) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), 6) रिंकी कुमारी (मुंबई), 7) सोनाली कुमारी (मुंबई), 8) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर).

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.