क्रीडानगरीतून- राणाला राग पडला महाग
Marathi April 13, 2026 11:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई- चेपॉकच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सच्या नीतिश राणाचा संताप त्यालाच महागात पडला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ऐकू येईल अशा अपशब्दांचा वापर केल्यामुळे राणावर सामन्याच्या मानधनाच्या पंचवीस टक्के दंडाची कारवाई करण्यात आली असून त्याच्या शिस्तभंग नोंदीत एक डिमेरिट गुणही जमा करण्यात आला. सुरुवातीच्या तीन सामन्यांत 15, शून्य आणि 5 अशा निराशाजनक धावा केल्यानंतर राणाला अंतिम अकरातून बाहेर बसवण्यात आले होते. तो डगआऊटमध्ये असतानाच मैदानावर ट्रिस्टन स्टब्सने ग्लोव्ह्ज बदलण्याची मागणी केली. त्यावेळी दिल्लीला दोन षटकांत 32 धावांची गरज होती आणि 36 चेंडूत 60 धावांवर नाबाद असलेला स्टब्सच त्यांच्या विजयाची एकमेव आशा होता. ग्लोव्ह्ज बदलण्याची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर राणा चांगलाच भडकला. चौथा पंच अनीश सहस्रबुद्धे यांच्याशी त्याची जोरदार वादावादी झाली आणि त्यातूनच अपशब्दांचा वापर झाल्याचे समोर आले.

सॅमसनची रोहितकोहली क्लबमध्ये प्रवेश!

चेन्नई – चेपॉक मैदानावर संजू सॅमसनने दमदार शतक झळकावत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले. टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा पार करणारा तो चौथा हिंदुस्थानी फलंदाज ठरला.

चेन्नई सुपर किंग्जच्या संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक ठोकले. यंदाच्या हंगामातील हे पहिले शतक असून, आयपीएल कारकिर्दीतील त्याचे चौथे शतक ठरले. चेन्नईविरुद्ध चेपॉकवर कोणत्याही सीएसकेच्या फलंदाजाने केलेले हे दुसरे शतक आहे. यापूर्वी  मुरली विजयने 2012 च्या क्वालिफायरमध्ये 113 धावांची खेळी केली होती.

संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा पार करत 401 षटकारांची नोंद केली. या आधी रोहित शर्मा (554), विराट कोहली (441) आणि सूर्यकुमार यादव (442) यांनी हा टप्पा गाठला आहे.

sirajne पंतची पाचव्यांदा उडवली विकेट

चेन्नई – ऋषभ पंत पुन्हा एकदा मोहम्मद सिराजसमोर टिकू शकला नाही. आयपीएलच्या लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यात सिराजने पंतला अवघ्या 18 धावांवर बाद करत त्याची पाचव्यांदा शिकार केली. टी-20 मध्ये दोघांमध्ये 10 डावांत रंगलेली ही लढत सिराजच्या बाजूने झुकलेली दिसते. पंतने सिराजविरुद्ध 93 धावा केल्या असल्या, तरी वारंवार बाद होणं त्याच्या
फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. महत्त्वाच्या क्षणी पंतची विकेट घेऊन सिराजने गुजरातला मोठा फायदा करून दिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.