Uttar Pradesh News: "गाव बनलं 'गॅस प्लांट'! UP मधील खेड्यात पाइपलाइनने पोहोचतोय गोबर गॅस; १२५ कुटुंबं टेन्शन फ्री"
esakal April 13, 2026 02:45 PM

गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि टंचाई यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना, उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील 'एकौनी' या छोट्याशा गावाने देशाला आत्मनिर्भरतेचा एक नवा मार्ग दाखवला आहे. या गावाने पारंपारिक इंधनाला फाटा देऊन 'गोबर गॅस'चा असा यशस्वी प्रयोग केला आहे की, आता येथील घराघरांत पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचत आहे.

सध्या जगभरात इंधनाचे संकट गडद होत आहे, तेव्हा एकौनी गावातील सुमारे १२५ कुटुंबे गॅस सिलिंडरच्या कचाट्यातून पूर्णपणे मुक्त झाली आहेत.

बीटेक इंजिनिअरची 'स्मार्ट' संकल्पना

या क्रांतीमागे गावातील तरुण उद्योजक चंद्रप्रकाश सिंह यांचा मोठा वाटा आहे. चंद्रप्रकाश यांनी NIT भोपाळमधून बीटेक केल्यानंतर शहरात नोकरी करण्याऐवजी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या गोठ्याला आधुनिक स्वरूप दिले आणि तिथे 'बायोगॅस प्लांट' उभारला. सुरुवातीला गावकऱ्यांनी शंका उपस्थित केल्या, पण आज याच प्रकल्पामुळे संपूर्ण गाव स्वयंपूर्ण झाले आहे.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप मिळणाऱ्या प्रमुख सुविधा

नॅशनल हायवे १९ च्या कडेला असलेल्या या गावात सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. एलपीजी (LPG) सिलिंडरच्या तुलनेत येथील गॅस अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे. यामुळे गावकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होत आहे.या प्रकल्पामुळे महिलांना धुरापासून सुटका मिळाली असून स्वयंपाक करणे सोपे झाले आहे.

पर्यावरण आणि शेतीला जोड

हा प्रकल्प केवळ गॅसपुरता मर्यादित नाही. गॅस निर्मितीनंतर उरलेल्या अवशेषापासून (Slurry) उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत तयार केले जाते. याचा वापर गावकरी आपल्या शेतात करत आहेत, ज्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चही कमी झाला आहे. तसेच, गोबर गॅसवर बनवलेले जेवण अधिक चविष्ट लागते, असा गावकऱ्यांचा अनुभव आहे.

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११ प्रशासनाकडून कौतुक आणि विस्तार

चंदौलीचे जिल्हाधिकारी (DM) चंद्र मोहन गर्ग यांनी स्वतः या गावाला भेट देऊन बायोगॅस प्लांटची पाहणी केली. चंद्रप्रकाश सिंह यांच्या कामाचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इतर मोठ्या गोशाळांमध्येही हे 'एकौनी मॉडेल' राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

देशासाठी प्रेरणादायी उदाहरण

इराण-इस्रायल युद्ध आणि जागतिक परिस्थितीमुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असताना, एकौनी गावाने दाखवून दिले आहे की स्थानिक संसाधनांचा योग्य वापर केल्यास ऊर्जा संकटावर मात करता येते. आज हे गाव केवळ चंदौलीसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी 'ऊर्जा आत्मनिर्भरतेचे' प्रतीक बनले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.