Buldhana News: आरटीईसाठी २८०१ विद्यार्थ्यांची निवड; लॉटरीद्वारे जागांची निश्चिती; २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन
esakal April 13, 2026 02:45 PM

बुलडाणा: जिल्ह्यात या शैक्षणिक वर्षासाठी एकूण २२६ शाळांमधील २९३३ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी जिल्हाभरातून एकूण ६१७१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून २८०१ विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी शुक्रवारी (ता.१०) रोजी जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना १० ते २० एप्रील याकालावधीत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत, जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया (ता.६) रोजी नुकतीच झाली.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश २० एप्रिल २०२६ पर्यंत निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे. निवड झालेल्या बालकांना १० ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आवश्यक आहे.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

पालकांनी कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश अंतिम करावा. केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी पालकांनी जिल्हास्तर व तालुकास्तरावरील शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे.

"पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे जावुन, शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश अंतीम करावा. तसेच पालकांनी SMS वर अवलंबुन न राहता https://student.maharashtra.gov.in/adm_portal या शासनाच्या संकेत स्थळावर जावुन, अर्ज क्रमांक नमुद करुन आपल्या पाल्याचा प्रवेशाची स्थिती तपासून घ्यावी."

- विकास म. पाटोल, शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प बुलडाणा

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमअश्या आहे शाळा व जागा

तालुका शाळा आरटीई जागा

बुलडाणा ३७ ५२७

चिखली १८ २१८

खामगाव ३३ ३७६

दे.राजा ११ १६८

मोताळा १५ १७७

लोणार १७ १८४

मलकापूर १२ १६३

तालुका शाळा आरटीई जागा

मेहकर २० ३२४

जळगाव जा. १३ १२६

नांदुरा १२ १४०

संग्रामपूर ११ ११२

शेंगाव १८ २८२

सिं.राजा ९ १३४

एकुण २२६ २९३१

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.