Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?
esakal April 13, 2026 02:45 PM

मालवण : देवली-परबवाडी (ता. मालवण) येथे दोन दिवसांपूर्वी विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर अचानक ५ किलो वजनाचा एक बर्फाचा गोळा (Malvan Ice Mystery) कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी हा गोळा पडला तेव्हा आकाशात पावसाचे ढग नव्हते की कोणतेही वादळ नव्हते. हवामानशास्त्रात या दुर्मिळ घटनेला ‘मेगाक्रायोमेटोर’ असे संबोधले जाते असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

दुपारच्या सुमारास देऊलकर यांच्या घरावर मोठा आवाज झाला. पाहणी केली असता छतावर बर्फाचा एक मोठा तुकडा दिसून आला. या बर्फाच्या गोळ्याचे वजन सुमारे ५ किलो होते. निळेशार आकाश असताना अचानक असा बर्फाचा गोळा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गोळ्याचे निरीक्षण केले असता, त्यात बर्फाचे अनेक लहान थर एकमेकांना चिकटलेले दिसून आले.

Snake Found in Bike : भयंकर! दुचाकीच्या सीटखाली फणा काढून बसला होता 6 फुटी काळा नाग; रात्रीच्या वेळी घरच्यांची उडाली झोप, पुढे काय झालं? यंदा मॉन्सून लांबण्याची भीती

तज्ज्ञांच्या मते, पश्चिमेकडील जेट स्ट्रीम अजूनही दक्षिणेकडे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. जोपर्यंत हा प्रवाह हिमालयाच्या उत्तरेला सरकत नाही, तोपर्यंत मॉन्सून सक्रिय होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यावर्षी मॉन्सून लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tiger Sighting Sindhudurg : तळकट परिसरात पट्टेरी वाघाचा वावर; 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित नकाशाने वन्यजीव धोक्यात? प्रकल्पाच्या मार्गात नवे आव्हान! हवामानशास्त्रीय दुर्मीळ घटना

याबाबत हवामान अभ्यासक प्रा. हसन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक अत्यंत दुर्मीळ हवामानशास्त्रीय घटना आहे. सध्या भारतात उष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह आणि पूर्वीय जेट प्रवाह हे दोन्ही एकाच वेळी सक्रिय झाले आहेत. ही एक दुर्मीळ स्थिती आहे. उंचावर असलेला पश्चिमेकडील जेट प्रवाह जमिनीवरील आर्द्र हवा स्वतःकडे खेचून घेतो. जेव्हा ही हवा उंचावरील अतिथंड हवेच्या संपर्कात येते, तेव्हा ती वेगाने गोठते आणि मोठ्या बर्फाच्या गोळ्याचे रूप घेते. हे गोळे साधारण १० ते १२ किलोमीटर उंचीवरून खाली पडतात. खाली पडताना त्यांचा वेग ताशी १५० ते २०० किलोमीटर इतका असू शकतो.

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित! निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा परिणाम

ही घटना म्हणजे वाढत्या जागतिक तापमानवाढीचा आणि निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने जेट स्ट्रीम्स आपली शक्ती गमावत असून ‘ब्लॉकिंग पॅटर्न’मुळे अशा विसंगत घटना घडत आहेत. निसर्ग अशा बदलांमधून मानवाला भविष्यातील मोठ्या संकटाची पूर्वसूचना देत असल्याचे प्रा. खान यांनी स्पष्ट केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.