नागपूर: प्रेमात ब्रेकअप झाल्याने २७ वर्षीय तरुणाने सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ एप्रिल रोजी उघडकीस आली.
तन्मय राजेंद्र कोरे (वय २७, रा. भंडारा) असे युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय हा नेहरू गार्डनजवळील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.काही दिवसांपूर्वीच तो भंडाऱ्यातून नागपूरला आला होता. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने त्याला नकार दिला होता.
Nagpur News: अकोला जगातील चौथे ‘हॉट’ शहर; पारा ४३.१ अंशांवर, नागपूर @ ४१.४, उन्हाचे चटके वाढलेत्यामुळे तो तणावात होता. याबाबत नातेवाईकांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. यामुळे तणावात आला आणि युवतीच्या शोधात नागपुरात एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.
रात्री जेवण करून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी तो खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही.