Gold Price Today: जागतिक आणि देशांतर्गत बाजारात मागील एका आठवड्यापासून सातत्याने वाढ होऊ लागलेल्या सोन्याचे भाव आज घसरले. अमेरिका-इराण चर्चा अपयशी थरून पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आज सोन्यावर दबाव दिसून आला. त्यामुळे आज देशातील कमोडिटी आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोनं-चांदीचे भाव कमी झाले आहे.
सोन्याचा भावGoodreturnsच्या आकडेवारीनुसार आज सकाळी 10 वाजता राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,610 रुपये इतका आहे.
दरम्यान राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर शहरांमधील सराफा बाजारात 24 कॅरेटचा भाव 380 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज प्रति 10 ग्रॅम किंवा प्रति तोळा भाव 1,52,460 रुपये इतका झाला आहे. तर प्रति ग्रॅमचा भाव 15,246 रुपये इतका आहे.
आजचा भाव उच्चांकापासून 28 हजारांनी स्वस्त
चार दिवसांनंतर भाव घसरला
एका महिन्याची तुलना करता भाव 8 हजारांनी स्वस्त झाला आहे.
1 एप्रिलच्या तुलनेत आज सोनं 300 रुपयांनी स्वस्त आहे.
मुंबई, पुणे शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या भाव प्रति तोळा सुमारे 1,39,750 रुपये तर प्रति ग्रॅम 13,975 रुपये इतका झाला आहे. दरम्यान, 18 कॅरेटचा भाव मुंबईत प्रति 10 ग्रॅम 1,14,340 रुपये आहे. तर प्रति ग्रॅम 11,434 रुपयांना विकलं जात आहे.
22 कॅरेट सोनं एप्रिलमध्ये 500 रुपयांनी स्वस्त आहे.
मागच्या एका महिन्याचा विचार करता सोनं 11,000 रुपयांनी स्वस्त
एका महिन्याचा विचार केला तर 8 हजारांनी आजचा भाव कमी आहे.
सोमवारी कमोडिटी बाजार MCXवर सोनं 1,062 रुपयांनी घसरून 1,51,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 5,200 रुपयांनी घसरून 2,38,000 रुपये प्रति किलो वर व्यवहार करत आहे.
चांदीचा भावGoodreturns च्या आकडेवारीनुसार आज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, आणि राज्यातील इतर शहरांसह राजधानी दिल्लीमध्येही चांदीचा भाव 5 हजारांनी स्वस्त होऊन प्रति किलो 2,55,000 रुपये इतका झाला आहे.
Provident Fund Money: PPF मॅच्युरिटी आली? पैसे काढू नका! आधी हे 2 पर्याय जाणून घ्या; होईल मोठा फायदा! सोन्याचे भाव कसे असतील?अमेरिका-इराण चर्चेला यश न मिळाल्याने आणि तेलाच्या वाढत्या किमती यामुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये येत्या काळात मोठे चढ-उतार दिसू शकतात. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता असल्याने बाजारात अनिश्चितता वाढली आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या मध्यपूर्वेतील तणावामुळे आधीच किमती अस्थिर आहेत, तर महागाई वाढण्याच्या भीतीमुळे अमेरिकन फेड रिजर्वकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे, ज्यामुळे सोन्यावर दबाव आला आहे. म्हणजेच गुंतवणूकदार आता सोन्या ऐवजी इतर गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे.
त्यातच मजबूत होत असलेल्या अमेरिकन डॉलरमुळे सोन्याची सुरक्षित गुंतवणूकम्हणून असलेली मागणीही कमी होत आहे, त्यामुळे सध्या सोने-चांदीचे दर एका मर्यादेतच राहण्याची शक्यता असून पुढील वाटचाल मध्यपूर्वेतील परिस्थितीवर अवलंबून असेल.