Nagpur News: अकोला जगातील चौथे 'हॉट' शहर; पारा ४३.१ अंशांवर, नागपूर @ ४१.४, उन्हाचे चटके वाढले
esakal April 13, 2026 02:45 PM

नागपूर: विदर्भात अपेक्षेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढला असून, पाऱ्याने ४३ अंशांवर उसळी घेतली आहे. रविवारी अकोल्याचे कमाल तापमान उच्चांकी ४३.१ अंशांवर, तर नागपूरचा पाराही चाळिशीपार गेला आहे. सध्याची उष्णलाट बघता या आठवड्यात उन्हाचे चटके आणखी वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात उन्ह-पावसाचा खेळ रंगल्यानंतर आता खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाला आहे. याचा प्रत्यय रविवारी वैदर्भीयांना आला. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांतील तापमानात लक्षणीय वाढ झाली. गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात दोन अंशांची वाढ होऊन पारा ४१.४ वर पोहोचला. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली. येथे नोंद झालेले तापमान देशातील उच्चांकी ठरले आहे. उल्लेखनीय म्हणजे, जगातील पहिल्या चार उष्ण शहरांमध्ये अकोल्याचा समावेश आहे.

Nagpur News: गोंदियात लघु न्यायसहायक प्रयोगशाळा का नाही?; ७० किमीवर प्रादेशिक प्रयोगशाळा असताना, वर्धेत लघु प्रयोगशाळेला मान्यता

जागतिक हवामानाची नोंद ठेवणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे. अमरावती शहरानेही (४२.४ अंश) उन्हाच्या बाबतीत जगात सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. याशिवाय वर्धा (४२.० अंश), वाशीम (४१.६ अंश), गडचिरोली (४१.० अंश), चंद्रपूर (४१.० अंश) येथेही उन्हाचा तडाखा जाणवला. उन्ह व उकाड्याने तरुणाईसह सारेच जण त्रस्त आहेत.

उष्णलाटेसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या काही दिवसांत पारा पंचेचाळिशीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संभाव्य उष्णलाट व उष्माघाताची शक्यता लक्षात घेता नागरिकांना अधिक सावध व सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः भर दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते.

Premium|Human Behavioral Psychology: स्व च्या प्रवासात... या तीन ‘पी’ मध्ये स्वत:ला अडकून देऊ नका..! विदर्भातील कमाल तापमान

शह तापमान

अकोला ४३.१

अमरावती ४२.४

वर्धा ४२.०

वाशीम ४१.६

नागपूर ४१.४

गडचिरोली ४१.०

चंद्रपूर ४१.०

बुलडाणा ४०.६

भंडारा ४०.०

यवतमाळ ४०.२

गोंदिया ४०.५

ब्रह्मपुरी ३९.६

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.