Kolhapur Fraud Case : कोल्हापुरात 'दामदुप्पट'च्या नावाखाली 3 कोटींचा गंडा; पुणे गाठून मास्टरमाईंड वैशाली गुरवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे श्रीमंता बाजार?
esakal April 13, 2026 02:45 PM

कोल्हापूर : श्रीमंता बाजारच्या माध्यमातून दामदुप्पटचे आमिष दाखवून तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या टोळीतील संशयित महिलेला आर्थिक गुन्हे शाखेने अटक (Kolhapur Fraud Case) केली. वैशाली काशिनाथ गुरव (वय ३५, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. पुण्यातून तिला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, गुंतवणूकदारांकडून ३४ हजारांच्या रकमेला पंचाहत्तर दिवसांत दुप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेण्यात आली होती. याप्रकरणी अकरा संशयितांवर गुन्हा दाखल असून, सूत्रधार वैशाली गुरव पसार होती. पुण्यातील चतु:श्रृंगी परिसरात ती असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी पथकासह छापा टाकून तिला अटक केली.

Sangli Bribery Case : पती शिक्षक, पत्नी सरपंच; दोघांनाही 35 हजारांची लाच भोवली! ACB च्या कारवाईनंतर सांगली जिल्हा परिषद ॲक्शन मोडमध्ये... कमिशनमधून मोटारींची खरेदी

संशयित गुरव ही मुख्य सूत्रधार श्रीकांत रामाचार व धर्मेंद्र सिंगरसोबत सुरुवातीपासून कार्यरत आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी तिने अनेक फंडे अवलंबले होते. तिला मिळालेल्या मोबदल्यातून दोन मोटारींचीही ती मालकीन बनली. तसेच इतर रक्कम मालमत्ता, दागिन्यांत गुंतविल्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील तिचा साथीदार सिंगर अद्याप पोलिसांना मिळून आलेला नसल्याने त्याचाही शोध सुरू आहे.

Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप गुंतवणूकदारांना धमकी

गडहिंग्लमधील काही गुंतवणूकदार सुरुवातीला तिच्याकडे परताव्याची मागणी करण्यासाठी गेले होते. पण, तिने अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे तपासात समोर येत आहे. महिला असल्याचा गैरफायदा घेत ती आजपर्यंत पोलिसांना गुंगारा देत होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.