नवी दिल्ली : भारताच्या सोनम मस्कर हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये पदक पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली.
मात्र, तिला १८८.५ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये फक्त एकाच सुवर्णपदकावर मोहर उमटवता आली. भारतीय संघ पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला.
Sunil Chhetri: सुनील छेत्रीचा राष्ट्रीय फुटबॉल शिबिरात समावेश; आशियाई करंडक पात्रता फेरी, राहुल भेके यालाही स्थानचीनच्या नेमबाजांनी आठ सुवर्ण, तीन रौप्य व दोन ब्राँझ अशी एकूण १३ पदके पटकावली व पहिल्या स्थानावर मजल मारली. जर्मनीच्या संघाने एक सुवर्ण व एक रौप्य अशी दोन पदके पटकावली व दुसरे स्थान पटकावले.
चीनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या वांग झिफेईने २५२.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेच्या जिनेट हेग ड्युस्टॅडने २५२.४ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या हान जियायूने २३१.५ गुणांसह ब्राँझपदक मिळवले.