नागपूर: नागपुरात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा असताना अवघ्या ७० किलोमीटर अंतरावरील वर्धा जिल्ह्यात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तसा अद्यादेश जारी केला. मात्र नागपूरपासून दीडशे किलोमीटर अंतर असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये लघु प्रयोगशाळा का नाही, असा सवाल पुढे आला आहे.
काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. या बदलणाऱ्या गुन्ह्यांत शास्त्रीय संशोधनातून सत्य बाहेर काढण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांची भूमिका महत्त्वाची असते. राज्यात नागपूसह पुणे, संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड आणि कोल्हापूर येथे प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळा आहेत. तर सोलापूर, ठाणे, धुळे, रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यात लघु प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. पूर्वी विदर्भातील पोलिस ठाण्यात घडलेल्या गुन्ह्यांतील मुद्देमाल केवळ नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी येत होता.
Nagpur News: गारे पालमा कोळसा प्रकल्प ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचामुख्यमंत्री फडणवीस ; महानिर्मितीच्या खाणीतून पहिल्या कोळसा रॅकचे आगमनपुढे अमरावती येथे प्रयोगशाळा उभारली. गडचिरोली ते नागपूर हे दोनशे किलोमीटरचे अंतर कापून मुद्देमाल आणणाऱ्या पोलिसांना नागपुरात येणे कष्टदायी होते, यामुळे चंद्रपूर येथे लघु प्रयोगशाळा स्थापन केली. गोंदिया जिल्ह्यातील काही भाग नक्षलग्रस्त घोषित केला होता. त्यामुळे या जिल्ह्यात लघु प्रयोगशाळेची मागणी पुढे आली होती, परंतु त्या मागणीची दखल शासनाने घेतली नाही.
मात्र अवघ्या ७० किलोमीटर असलेल्या वर्धा जिल्ह्यात सुमारे १२ कोटी खर्चुन लघु प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. वर्धेच्या पालकमंत्र्यांनी विविध प्रकल्पांसह लघु प्रयोगशाळेची मान्यता वर्धेसाठी मिळवली, त्यामुळे गोंदिया जिल्ह्यच्या पालकमंत्री महोदयांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.
Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका? नागपुरातील प्रयोगशाळेवर भारनागपुरातील प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळेत नागपूर, शहर व ग्रामीण, भंडारा, गोंदियासह वर्धा जिल्ह्यातील नमुने परीक्षणासाठी येतात. नागपुरातील प्रयोगशाळेवर मुद्देमाल तपासणीचा भार लक्षात घेता अहवालास विलंब होतो. यामुळे वर्धा जिल्ह्यात लघु प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. त्याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात दारूबंदी व इतर प्रकरणांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. गोंदिया जिल्ह्यातील चिचगढ, देवरी, सालेकसा, आमगाव या दुर्गम भागातून पोलिसांना मुद्दमाल आणताना होणारा त्रास राज्य शासनाने लक्षात घेत गोंदिया जिल्ह्यात न्यायसहायक लघु प्रयोगशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.