शाहरुख खानच्या एक्स बॉडीगार्डकडून पोलखोल; खरंच बॉडीगार्ड्सना 2.5 कोटींची सॅलरी मिळते? सत्य सर्वांना सांगितलं
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 17, 2026 09:43 AM

Shah Rukh Khan Ex Bodyguard Yaseen Khan On Salary Claims: सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड्स (Celebrity Bodyguard) कोट्यवधींची सॅलरी घेतात, अशा चर्चा रंगतात. अशातच आता बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Bollywood King Shah Rukh Khan) एका एक्स बॉडीगार्डनं त्यांना मिळणाऱ्या खऱ्याखुऱ्या सॅलरीबाबत (Celebritys Bodyguard Salary) मोठा खुलाला केला आहे. शाहरुखचा एक्स बॉडीगार्ड यासिन खान (Shah Rukh's Ex-Bodyguard Yasin Khan) म्हणाला की, सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड्स कोट्यवधींचं मानधन कमावतात, असं सांगणारे रिपोर्ट्स पूर्णपणे खोटे आहेत. त्यानं स्पष्ट केलंय की, सुरक्षा कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक निश्चित वेतन दिलं जातं. सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डला वर्षाला कोट्यवधी रुपये मिळतात, याबद्दल सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर यासिन खान (Yasin Khan) यानं स्पष्ट केलंय की, त्यांच्या वेतनाबाबत दिले जाणारे आकडे खूपच फुगवून सांगितले जातात. त्यानं सांगितलं की, बॉडीगार्ड्स वर्षाला 2 कोटी ते 2.5 कोटी रुपये कमावतात, असं इंटरनेटवर फिरणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत. 

एका मुलाखतीत बोलताना यासिन म्हणाला की, एक्स बॉडीगार्ड्सना निश्चित वेतन मिळतं. पण, जर एखादा मोठा इव्हेंट किंवा सिनेमांच्या शुटिंगवेळी किंवा इतर काही विशिष्ट कामांसाठी त्यांना अतिरिक्त मोबदला दिला जातो. पण, प्रत्येकालाच दिला जाईल, असं काही फिक्स नसतं. तसेच, यासिननं बोलताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या, बॉडीगार्ड्सना प्रत्येक महिन्याला 10 लाख रुपये दिले जातात, या अफवा फेटाळत त्यानं सांगितलं की, या क्षेत्रातील अनुभवी बॉडीगार्ड्सना साधारणपणे दरमहा केवळ 1 लाख रुपयांपर्यंत वेतन दिलं जातं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hindirush (@hindirush)

विराट कोहली, सचिन तेंडुलकरसोबतही केलंय काम 

यासिन खान म्हणाला की, बॉडीगार्ड्स साधारणपणे कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, आधी फिल्म्सच्या शुटिंगवेळी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम एवढी चांगली नव्हती. पण, आता यामध्ये खूप सुधारणा करण्यात आल्यात. मुलाखतीत बोलताना त्यानं सांगितलं की, फिल्म सेलिब्रिटींच्या बाबतीत बॉडीगार्ड्सची भूमिका फारच महत्त्वाची असते, पण त्यांना फारशी ओळख मिळत नाही. बॉडीगार्ड्सचं काम तेव्हाच चर्चेत येतं, जेव्हा एखादी मोठी घटना घडते. यासीन खाननं शाहरुख खान व्यतिरिक्त विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम केलंय. 

"जर कोणी मोठ्या स्टारचा बॉडीगार्ड असेल, तर त्याचा पगार ठरलेलाच..."

यासिन खाननं नुकतीच 'हिंदी रश'ला मुलाखत दिलीय. तो म्हणाला की, "मला असं वाटतं की, सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात... असं नाहीय की, लोक 2 ते 2.5 कोटी कमाई करतात. जर एखादा मोठा स्टार बॉडीगार्ड असेल, तर त्याचा पगार ठरलेला असतो. याव्यतिरिक्त, जेव्हा कधी एखादा सिनेमा बनतो, तर वेगळं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. निर्मात्यांच्या हिशोबानं त्यांना त्या फिल्मसाठी एक ठराविक रक्कम दिली जाते... "

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hindirush (@hindirush)

"आम्हाला सॅलरी तर मिळायची, पण त्यात भागायचं नाही..."

यासिन खान म्हणाला की, "जेवढं मला आठवतंय, सर्वात आधी फिल्म इंडस्ट्रीत बॉडीगार्ड्सना सॅलरी मिळायची नाही. नियम असा होता की, प्रोड्युसर्स फक्त ड्रायव्हर्स, मेकअर मॅन आणि स्पॉट बॉयलाच सॅलरी द्यायचे. जेव्हा मी शाहरुख खानसोबत काम करायला सुरुवात केली, तर मला वाटलं की, फिल्म होतेय, आम्हीही काम करतोय, आम्हाला आमचा पगार मिळत होता, पण, फक्त कसंबसं घर चालवण्यापुरताच..."

"मी निर्मात्यांशी जाऊन बोललेलो..."

यासिन खाननं पुढे बोलताना सांगितलं की, "मी निर्मात्यांशी संपर्क केलेला आणि म्हटलेलं की, जसे दुसऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतात, तसंच आम्हालाही मोबदला मिळायला हवा. कोणताही नियम नव्हता, पण समजुतदारपणा आणि जवळच्या नातेसंबंधांमुळे त्यांनी फिल्म्स आणि जाहिरातींसाठी एक निश्चित वेतन द्यायला सुरुवात केली. जेव्हा मला पैसे मिळू लागले, त्यावेळी इंडस्ट्रीत इतर लोकांनी म्हटलं की, शाहरुखच्या बॉडीगार्ड्स ना वेतन मिळतंय, मग आम्हालाही मिळालं पाहिजे... त्यांनीही निर्मांत्यांशी संपर्क केला आणि त्यांनाही वेतन मिळायला सुरुवात झाली..." 

Allu Arvind Advice Mrunal Thakur: 'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; अल्लू अर्जनुच्या वडिलांचा मराठमोळ्या अभिनेत्रीला सल्ला

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.