IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI
esakal April 17, 2026 01:45 PM

अहमदाबाद : कोलकता नाईट रायडर्स-गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज (ता. १७) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल साखळी सामना रंगणार आहे. पहिल्या पाचपैकी चार लढतींमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर कोलकता संघाची पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम आहे. गुजरातच्या संघाने मागील दोन लढतींमध्ये दमदार कामगिरी करीत विजय साकारला आहे. याप्रसंगी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

हर्षित राणा व आकाशदीप यांना दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल मोसमातून माघार घ्यावी लागली. तसेच बीसीसीआयच्या आदेशानुसार मुस्तफिजूर रहमान याला रिलीज करण्यात आले. या तीन खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका कोलकता संघाला आयपीएलमध्ये बसताना दिसत आहे. कोलकता संघासाठी आणखी एक बाब निराशाजनक ठरत आहे. सुनील नारायण व वरुण चक्रवर्ती या दोन अनुभवी फिरकी गोलंदाजांना सपशेल अपयशाला सामोरे जावे लागत आहे.

IND vs NZ 3rd T20 : टी-२० मालिका विजयाची मोहीम आजच फत्ते? न्यूझीलंडविरुद्ध आज तिसरा सामना; ईशानच्या फॉर्ममुळे संजू अडचणीत...

कोलकता संघाचे आतापर्यंतचे काही निर्णय चुकीचे ठरले आहेत. अशा निर्णयांनी भुवयाही उंचावल्या आहेत. टीम सेईफर्ट व राचिन रवींद्र या स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सातत्याने संघाबाहेर ठेवण्यात येत आहेत.

नाणेफेक जिंकल्यानंतर जे निर्णय घ्यायला हवेत, ते योग्यही घेतले जात नाहीत. पंजाबविरुद्धच्या लढतीत पावसाचा व्यत्यय आला. या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Ind vs SA 3rd ODI : भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; रोहित-विराटवर पुन्हा मदार; आफ्रिकाविरुद्ध आज तिसरा एकदिवसीय सामना घरच्या मैदानावर विजय?

गुजरातला घरच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या मोसमात विजय मिळवता आलेला नाही. कोलकताविरुद्धच्या लढतीत त्यांचा संघ घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. शुभमन गिल, जॉस बटलर हे फलंदाज फॉर्ममध्ये असून, प्रसिध कृष्णा व राशिद खान हे गोलंदाजीत चमक दाखवत आहेत.

संभावित प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स:  शुभमन गिल (कर्णधार),अनुज रावत, जोस बटलर, कुमार कुशाग्र, ग्लेन फिलिप्स, राशिद खान, मानव सुथार, निशांत सिंधु, राहुल तेवतिया, वॉशिंगटन सुंदर, गुरनूर बरार, अरशद खान, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कगिसो रबाडा, आर साई किशोर, इशांत शर्मा, अशोक शर्मा, जेसन होल्डर

कोलकता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रोवमैन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, सुनील नारायण, अनुकूल रॉय, वैभव अरोड़ा, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती, कैमरन ग्रीन, मथीशा पथिराना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.