ठाणे : होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुष विभागात, तर स्नेहविकास, ओम वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिला विभागात विजयी वाटचाल केली. श्री मावळी मंडळाकडून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ठाणे येथे सुरू आहे. पुरुष विभागात डॉन बास्को संघाचा जीत सिंग, तर महिला विभागात एस. आय. ई. एस. संघाची आस्था सिंग हे गुरुवारच्या दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू ठरले.
ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष विभागात ठाण्याच्या होतकरू मंडळाने उपनगरच्या केदारनाथ मंडळावर २८-१९ अशी मात केली. पूर्वार्धात ०९-१० अशा पिछाडीवर पडलेल्या होतकरू संघाने उत्तरार्धात आपला खेळ गतिमान केला आणि लोण देत सामना आपल्या बाजूने झुकवला. मितेश चव्हाण याच्या चढाया, तर तुषार यादव, देवेन पाटील यांचा भक्कम बचाव याला याचे श्रेय जाते. केदारनाथ संघाच्या ओमकार कदम, ओम कदम यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला. मिडलाईन संघाने अभिषेक भोईर, धीरज बैलमारे, अजित चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर अष्टविनायक संघाला ३१-२३ असे नमवले. अष्टविनायक संघाचे स्वयम गोंधळे, सागर भोईर चमकले.
Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजयजय भवानी तरुण मंडळाने चिंतामणी स्पोर्ट्स संघाला ३४-२५ असे पराभूत केले ते तुळशीदास शिर्के, कुणाल शिंदे, ऋषिकेश पवार यांच्या चढाई पकडीच्या खेळामुळे. विश्रांतीला १५-१० अशी विजयी संघाकडे आघाडी होती. चिंतामणी संघाचे हर्षल शहा, विशाल सणस उत्तम खेळले. बालगोपाळ मित्र मंडळाने ओवळी मंडळावर ३४-३१ असा विजय मिळवला.
पहिल्या डावात चुरशीची लढत झाल्यामुळे मध्यंतरला गुणफलक १४-१४ अशा बरोबरीत होता. मध्यंतरानंतर बाळ गोपाळ संघाच्या फाजल नाडर, राज चौधरी, आतीश जीत यांनी आपला खेळ उंचावत संघाला निसटता विजय मिळवून दिला. ओवळी मंडळाच्या महेश कदम, प्रिन्स यादव, चिराग सिंग यांचा खेळ मध्यंतरानंतर थोडा कमी पडला.
Thane Kabaddi Tournament: ठाण्यात कबड्डीचा थरार! रा. फ. नाईक, टागोरनगर मित्र, ज्ञानशक्ती युवा संघांची विजयी सलामी इतर संक्षिप्त निकालपुरुष १) सत्यम सेवा वि. वि. रतन पाटील मंडळ ४१-१७, २) श्री समर्थ- कलवार वि. वि. श्री स्वामी समर्थ ३६-१७, ३) विवेक स्मृती वि. वि. विजय क्रीडा ३३-१६, ४) गावादेवी-जाभूळ वि. वि. सन्मित्र उपनगर ४६-१०. महिला : १) नवशक्ती स्पोर्ट्स वि. वि. किल्ले माऊली ३४-१७, २) विवेक स्पोर्ट्स वि. वि. डॉ. शिरोडकर मुंबई ५२-१८.