IND vs SA: टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारताचा फायनल रिहर्सल; हरमनप्रीतची सेना आज भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, सामना कधी आणि कुठे पाहता येणार
esakal April 17, 2026 02:45 PM

डरबन : भारतीय महिला क्रिकेट संघआणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. २०२५ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता भारतीय महिला संघाचं लक्ष्य येणारा वर्ल्डकप असणार आहे. महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ सुरू होण्यासाठी काही महिनेच उरले आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या मालिकेत भारतीय महिला संघाने २-१ ने मालिका आपल्या नावावर केली होती. आता भारतीय महिला संघ हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ५ टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्याची सुरुवात १७ एप्रिलपासून होणार आहे. याचा पहिला सामना हा किंग्समीड, डर्बन, दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

Indian Women Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाची विश्वकरंडक पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी

या लढतीच्या पूर्वसंध्येला भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरम्हणाली की, दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धची टी-२० मालिका ही आगामी टी-२० विश्वकरंडकाची रंगीत तालीम असणार आहे. इंग्लंड व वेल्स या देशांमध्ये १२ जून ते ५ जुलै या कालावधीत महिलांच्या टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या मालिकेकडे आमचा संघ गांभीर्याने बघत आहे. टी-२० विश्वकरंडकाआधी आम्हाला या मालिकेकडे सराव म्हणून बघता येणार आहे.

सामना कधी आणि कुठे पाहता येणार आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिका या मालिकेचे सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहेत. या सामन्याचे नाणेफेक ही ठीक रात्री ९ वाजता होणार आहे. या मालिकेचे सामने टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर यांची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे.

AUS vs IND: टी२० नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचा निर्धार, आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ODI मालिकेला सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा संपूर्ण संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, भारती फुलमाली, अनुष्का शर्मा, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रीचरणी, कशवी गौतम

भारताविरुद्ध टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, आयंडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, अयाबोंगा खाका, सुने लुस, ॲनेरी डेर्कसेन, तेबोगो माचेके (अनकॅप्ड), एलिझ-मारी मार्क्स, नॉनकुलुलेको म्लाबा, कायला रेनेके, तुमी सेखुखुने आणि क्लो ट्रायॉन.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.