GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...
esakal April 18, 2026 01:45 AM

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates: कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) वगळल्यास इतरांनी निराश केले. ग्रीनने KKR च्या रोव्हमन पॉवेल व अनुकुल रॉय यांच्यासह दमदार भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले होते. रिंकू सिंगला संधी मिळत नाही, अशी बोंब होती. पण, आज पाच षटकं हाताशी असूनही तो १ धावेवर माघारी परतला. GT च्या गोलंदाजांनी चेंडूला सुरेख टप्प्यात व लाईन लेंथवर टाकून KKR ला धक्के दिले. कोलकाताने शेवटच्या षटकांत २६ धावांत ५ विकेट्स गमवाल्याने गुजरातला सामन्यात पुनरागमनाची संधी मिळाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारा अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. अंगकृश रघुवंशी व टीम सेइफर्ट हेही अपयशी ठरले आणि KKR ने ३२ धावांत ३ विकेट्स गमावल्या. त्यानंतर ग्रीन-पॉवेल ( २७) जोडीने ५५ धावांची भागीदारी केली. ग्रीन व अनुकुल ( ९) यांनी २३ चेंडूंत ६० धावा जोडल्या. पण, प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी तोडली. त्यानंतर कागिसो रबाडाने डावातील तिसरी विकेट घेताना रिंकू सिंगला ( १) स्वस्तात माघारी पाठवले. २०२२ नंतर प्रथमच रबाडाने एका सामन्यात ३ विकेट्स घेतल्या.

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

रमनदीप सिंग ८ चेंडूंत १७ धावा करून अशोक शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सुनील नरीनही भोपळ्यावर माघारी परतला. ग्लेन फिलिप्सने सुरेख झेल टिपला. १६ ते १८ षटकात ग्रीनला फक्त १ चेंडू खेळायला मिळाला आणि KKR च्या डावपेचाचं आश्चर्य वाटले.

मोहम्मद सिराज ( २-२३) व अशोक शर्मा ( २-४५) यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. KKR ने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या आणि गुजरातने इथे मॅच खेचून आणली. राशीद खानने २०व्या षटकात सहा धावा देताना विकेट घेतली. कोलकाताचा संपूर्ण संघ १८० धावांत तंबूत परतला. ग्रीनने ५५ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.